ताज्या घडामोडी
सोनेगाव येथे आरोग्य तपासनी शिबीर
तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे
चिमूर : तालुक्यातील सोनेगाव येथे श्री गुरुदेव सेवा मंडळ च्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आली.
श्री गुरुदेव सेवा मंडळ व भारतीय क्रांतिकारी संघटनेचे संघटक कैलाश भोयर याचे विशेष पुढाकाराने मोफत आरोग्य तपासणी शिबीरात गावातील नागरिकांनी आपल्या आजाराची तपासणी करून घेतली. आजाराने ग्रस्त रुग्णाला आवश्यक उपचारासाठी डाॅक्टराचे मार्गदर्शन लाभले व मोफत उपचार करण्यात आले.
या शिबिराचा लाभ जनसामान्यांना मिळावा यासाठी सुखदेवराव तिजोरे, बाबा उताणे, रविना दाभेंकर, आशा येडलावार व आयुर्वेदिक कंसल्टेंट संजय येडलावार इत्यादींनी प्रयत्न केलीत.