जागतिक चिमणी दिना निमित्य लावल्या घरोघरी पक्षीघागर
तालुका प्रतिनिधी : जागृती मरस्कोल्हे नागभिड
दिनांक २० मार्च रोज शनिवार जागतिक चिमणी दिवस झेपनिसर्ग मित्र संस्था.नागभीड यांनी नगरपरिषद नागभीड परिसरामधील बहुतांश नागरिकांच्या घरोघरी पक्षांसाठी पण्याचे घागर लावण्यात आले व आपण लावलेल्या पाण्याच्या घागरींचा महत्व पटवून सांगण्यात आले यामध्ये नागरिकांचा सुद्धा आपल्या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळला.
उन्हाची तीव्रता लक्षात घेता पक्ष्यांसाठी पाणी मिळविणे कठीन आहे.उन्हाच्या कडाक्यामुळे आपल्या घशाला कोरड पडतोयं, तर मग पक्ष्यांचे काय होत असेल! तहानलेल्या पक्ष्यांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबविण्यासाठी आता पक्षीप्रेमी पुढाकार घेऊ लागलेत. म्हणूनच गजबजलेल्या सिमेंटच्या जंगलात दाराबाहेर,खिडकीत.अंगणामध्ये असलेल्या झाडांवर किंवा अंगणात पक्ष्यांसाठी पाण्याचे घागर लावले,पक्ष्यांची केविलवाणी अवस्था पाहून झेप निसर्गमित्र संस्था.नागभीड यांचे अध्यक्ष डॉ.पवन नागरे यांच्या संकल्पनेतुन परिसरामध्ये घरोघरी पाण्याच्या घागर लावल्याचे शहरामध्ये दिसुन येत आहे हा सर्व उपक्रमाची प्रसिद्ध करीत असतांना अधिकाधिक नागरिकांपर्यंत त्यांची माहिती व्हावी, त्यातून आणखी काही नागरिक पुढे येतील अशी अपेक्षा होती. त्यानुसार एकापाठोपाठ अनेक नागरिक या उपक्रमात सहभागी झाल्याचे दिसायला येत आहे.या उपक्रमामध्ये बच्चे कंपनीदेखील सक्रिय असल्याचे दिसायला आले आहे.पाण्याच्या घागरींचा वितरण आज तीन दिवसापासून झेप करून राहिली जवळपास हजार पाण्याच्या घागर लावण्यात आल्या, याबराेबरच नागरिकांना पक्ष्यांसाठी अन्नाची व्यवस्थाही कराव व टाकाऊ वस्तू पासून पक्ष्यांसाठी पाण्यासाठी व अन्नासाठी चंचुपात्र कसे तयार करावे यांबद्दल थोडंक्यात सांगण्यात आल झेप निसर्गमित्र संस्थेचे उद्देश म्हणजे जास्तीत जास्त पाण्याच्या घागर लावण्याचा प्रयत्न करूया व पर्यावरणाला समतोल राखण्यासाठी पक्ष्यांचे संवर्धन करूया आणि आपल्या समोरच्या पिढीला चिऊताईच व इतर पक्ष्यांना बघण्यासाठी तीच आवाज ऐकण्यासाठी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करूया. ..!
या सर्व उपक्रमामध्ये झेप या संस्थेचे अध्यक्ष डॉ पवन नागरे आणि नागभीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चंद्रकांत चौव्हान साहेब यांनी मातींच्या घागर साठी वेशेस सहकार्य केले.या सर्व उपक्रमध्ये झेप निसर्ग मित्र संस्था नागभीड चे उपाध्यक्ष अमोल वानखेडे,सचिव अमित देशमुख,पक्षीमित्र राजेंद्रजी भाजे सर क्षितिज गरमळे,तुषार गजभे,सलीम शेख,विरेंद्र सायरे सर,तन्वीर कुरेशी,जितेंद्र शामकुळे, गुलाब राऊत,करण मूलमुले,रितेश कोरे,अक्षय जीवतोडे,तेजस पंत,प्रज्वल नागपुरे,मंगेश फुकट,निखिल रामटेके,रोशन आटंमांडे,वृषभ चौधरी,कुणाल तुपट यांनी विशेष परिश्रम घेतले ह्या उपक्रमासाठी नागभीडकरांकडून कौतुक व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा मिळून राहिल्यात….!