ताज्या घडामोडी

मरेगांव -वाढत्या प्रदुषणा बाबत सामान्य कामगार सेवाचे चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय समर्थ यांचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या कडे निवेदन सादर

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी

जिल्ह्याच्या मूल तालुक्यातील मरेगांव येथील जी .आर . किष्णा फेरो अलायॅ् कंपनी संदर्भात सामान्य कामगार सेवाचे जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय समर्थ यांनी आज गुरुवार दि.२५एफ्रिलला एक लेखी निवेदन चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे कडे सादर केले आहे.मूल तालुक्यातील मरेगांव येथे गेल्या काही वर्षांपासून जी .आर .क्रिष्णा फेरो अलाय् कंपनी कार्यरत असून सदरहु कंपनी या ठिकाणी विटा तयार करीत आहे.विटा तयार करण्यासाठी उपरोक्त कंपनी राखेचा वापर करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.वापरात येत असलेल्या राखेमुळे प्रदुषणात वाढ होत आहे.दरम्यान या प्रदुषणामुळे स्थानिक नागरिकांना बराच त्रास सहन करावा लागत आहे.या प्रदुषणामुळे लोकांना विविध प्रकारचे आजार जडत असल्याचे दत्तात्रय समर्थ यांनी दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे.या शिवाय या कंपनी भोवताल असलेल्या शेतजमीनी मधील शेत पीकांचे मोठे नुकसान होत असून शेतकऱ्यांना त्याची झळ पोहचत आहे.उपरोक्त कंपनी ही बंद करावी किंवा कंपनी व्यवस्थापनाने या बाबतीत पर्यायी व्यवस्था करुन नागरिकांचा त्रास वाचवावा अशी मागणी समर्थ यांनी केली आहे.या निवेदनाची एक प्रत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे आजच सादर केली असल्याचे समर्थ यांनी या प्रतिनिधीशी बोलताना चंद्रपूर मुक्कामी सांगितले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close