ताज्या घडामोडी

पाथरी येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सवी वर्ष साजरा

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सवी वर्ष 2023 यानिमित्ताने तहसील कार्यालय पाथरी च्या वतीने
दिनांक 13 सप्टेंबर 2023 बुधवार रोजी सकाळी 7 : 30 वा.प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते .

याप्रसंगी प्रभात फेरीला वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ परभणी च्या सचिव मा.सौ.भावनाताई नखाते तहसील कार्यालय पाथरीचे तहसीलदार मा.सौदागर तांदळे व आदी मान्यवर यांनी हिरवा झेंडा दाखवला.यामध्ये विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला,या प्रभात फेरीचा समारोप हुतात्मा स्मारक पाथरी या ठिकाणी करण्यात आला .

याप्रसंगी कार्यक्रमा चे अध्यक्ष म्हणून पाथरी तहसील कार्यालयाचे तहसीलदार मा.सौदागर तांदळे तर स्वागत अध्यक्षा म्हणून परभणी जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा सौ. भावनाताई नखाते उपस्थित होत्या,प्रमुख पाहुणे गटशिक्षणाधिकारी शिवाजीराव गीते,गटशिक्षण विस्ताराधिकारी मुकेशजी राठोड,पाथरी पोलीस स्टेशन चे पी.एस.आय.श्री एस.एन.थोरवे,नायब तहसीलदार श्री विनोद भराडे,आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ.इक्कर साहेब प्राचार्य के.एन.डहाळे सर, मुख्याध्यापक डी.आर.होगे सर,एन.ई.यादव सर शांतलिंग काळे सर,दिवाण सर,श्रीमती पंडित मॅडम,श्री धावारे आदी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close