ताज्या घडामोडी

नेरी पोस्ट ऑफिस ठरतोय ग्राहकांसाठी डोकेदुखी

ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी

सुरुवातीच्या काळात आतासारखे मोबाईल नव्हते तेव्हा जर माहिती आणि खुशाली कळवायची असेल तर पत्रे पाठवली जायची हे सर्व काम पोस्टामार्फत चालायची परंतु आज प्रत्येकाजवळ मोबाईल असल्यामुळे ते काम कमी झाले परंतु पोस्ट ऑफिसचे महत्त्व अजूनही तितकेच आहे. पोस्ट ऑफिस सार्वजनिक सुविधा आहे जी लोकांना विविध योजना पुरविते त्यामध्ये पोस्टल लाइफ इन्शुरन्स, आवर्ती ठेव खाते, सुकन्या समृद्धी योजना, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे, किसान विकास पत्र, सार्वजनिक भविष्य निधी, बचत बँक खाती, मासीक उत्पन्न योजना, जेष्ठ नागरिक यांच्या बचत योजना, इत्यादी अनेक कामासाठी लाभार्थ्यांना दररोज पोस्ट ऑफिस मध्ये यावे लागते परंतु नेरी येथील पोस्ट ऑफिस चे मागील काही दिवसापासुन नेट सेवा बंद आहे नेट सेवा बंद असल्याने बरेचसे काम बंद आहेत. त्याकडे कोणाचेही लक्ष नाही परत हे दुसऱ्या मजल्यावर असून ते बस स्टॉप च्या मेन रोडला लागून असल्यामुळे त्या इमारतीला पार्किंगसाठी कुठलीही व्यवस्था नसल्यामुळे ग्राहकांना आपली वाहने उभी कुठे? करावी याचा प्रश्न दररोज भेडसावत असतो. ज्येष्ठ नागरिकांना चढण्यासाठी असणाऱ्या पायऱ्या या खूपच छोट्या असल्यामुळे त्यांना चढण्याचा व उतरण्याचा त्रास सहन करावा लागतो तसेच अंध आणि अपंग व्यक्तींना कुठल्याही प्रकारची चढणे आणि उतरण्याची ग्राहकांची व्यवस्था केलेली नाही त्यामुळे नेरी पोस्ट ऑफिस मध्ये ग्राहकांची नेहमीच गैरसोय होत असून मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे नेरी पोस्ट ऑफिसची नेट सेवा लवकर सुरू करावी व इमारत ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरत असल्यामुळे इतरत्र पोस्ट ऑफिस हलवावे अशी नेरी परिसरातील ग्राहकांची मागणी आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close