ताज्या घडामोडी
चंद्रपूर जिल्हा महिला मुक्ती मोर्चा द्वारे डॉ आंबेडकर यांना आदरांजली

मुख्य संपादकःकु.समिधा भैसारे
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या कुटुंबाची काळजी न करता संपूर्ण आयुष्य जनतेच्या सुखासाठी त्यांचा हक्कासाठी आयुष्याच्या अंतापर्यंत लढले अशा महामानवाचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना मानवंदना देऊन आदरांजली वाहून चंद्रपूर जिल्हा महिला मुक्ती मोर्चा द्वारे संघटनेच्या हितासाठी कार्य करण्याची शपथ संघटनेचे पदाधिकारी यांनी घेतली
सदर मानवंदनेकरीता संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अँड मदन भैसारे जिल्हा उपाध्यक्ष सूरज लांडे महिला जिल्हा अध्यक्षा आरती ताई खोब्रागडे , गंगाताई भालेशंकर, राजकुमारी नगराळे, चंद्रपूर शहर उपाध्यक्षा मनिषा चट्टे, मनिषा विघ्ने, व इतर संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते









