ताज्या घडामोडी

ओला दुष्काळ जाहिर करून पिकविमा तात्काळ देण्याच्या मागणी साठी पाथरी तहसील समोर उपोषण सुरू

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

पाथरी तालुक्यात सर्व दुर सलग चार दिवस पावसाने झोडपुन काढल्याने खरीपातील पिके हातची गेली आहेत.त्यामुळे त्वरीत ओला दुष्काळ जाहिर करून शेतक-यांना विनाविलंब नुकसान भरपाई आणि पिक विमा देण्याच्या मागणी साठी महाविकास आघाडी सह तालुक्यातील शेतक-यांनी पाथरी तहसीलदारांना निवेदन देत जो पर्यंत ओलादुष्काळ आणि पिकविमा देणार नाहीत तो पर्यंत आज पासुनच उपोषण सुरू करण्याचा इशारा देत उपोषणास प्रारंभ केला आहे.
————————————
पाथरी तालुक्यात १० ऑक्टोबर पासुन सतत परतीचा पाऊस पडत आहे.शुक्रवारी १४ ऑक्टोबर रोजी परतीच्या पावसाने कहरच केला.सकाळी साडे दहा ते दुपारी एक वाजे पर्यंत मुसळधार पाऊस पडला त्या नंतर रात्री उशिरा पर्यंत संततधार पाऊस सर्वदुर होता.
या पावसाने शेतातील काढून ठेवलेले सोयाबीन पिक वाहुन गेले तर अनेक ठिकठिकाणी शेतात पाण्याचे तळे साचल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावल्या गेला. या सोबतच वादळी वारे आणि जोराच्या पावसा मुळे वेचनीला आलेल्या कापसाच्या वाती झाल्या,सोबतच वा-या मुळे कपासीचे पिक जमिनिशी लोळण घेत असल्याने या दोन्ही नगदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या विषयी तक्रार देण्यासाठी शनिवारी सकाळीच गावागावातून शेतकरी तहसिल कार्यालया कडे येत होते.अनेकांनी विमा कंपनीच्या कार्यालयात रांगा लाऊन विम्याच्या ऑफलाईन तक्रारी दाखल केल्या.यानंतर हेच शेतकरी तहसील कार्यालयात येऊन तक्रारी देत होते. महाविकास आघाडीच्या वतीनेने ही या वेळी पाथरी तहसिलदारांना निवेदन देऊन जो पर्यंत ओला दुष्काळ आणि पिक विमा देणार नाहीत तो पर्यंत उपोषण सोडणार नसल्याची भुमिका घेत तहसील कार्यालया समोर शेतक-यां सह उपयण सुरू केले आहे.
यावेळी विष्णू काळे ,अमोल भालेपाटील,अविराज टाकळकर,सदिप टेंगसे,महेश कोल्हे, कार्तिक घुंबरे, संदीप टेंगसे, कृष्णा चाळक,माणिकअप्पा घुंबरे,माऊली गलबे,सुनिल नायकल, अमोल इंगळे,राजकुमार नवघरे,परमेश्वर झुटे, शेख खालेद, सिद्धेश्वर इंगळे,कैलास सोळंके,अजय इंगळे,दीपक गवारे, बळीराम उगले, नवनाथ काळे, कृष्णा गलबे,पांडुरंग शिंदे,कृष्णा नायकल, बाळू कोल्हे, शरद यादव, दीपक झिंजन,शरद कोल्हे, सुनील पितळें सह पाथरी तालुक्यातील शेतकरी या वेळी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close