ताज्या घडामोडी

दुर्मिळ वन्यजीव मऊ पाठीचे कासव पाळल्याने हॉटेल मालकावर वन गुन्हा दाखल

महाबळेश्वर वन विभागाची कारवाई

प्रतिनिधीःप्रमोद राऊत कराड

वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार एका ठिकाणी फिशटॅंक मध्ये मऊ पाठीचे कासव पाळले असल्याची माहिती मिळाली.. महाबळेश्वर तापोळा मार्गावरील मौजे हरचंदी मोरेवाडी येथील नीलमोहर ऍग्रो रिसॉर्ट मधील फिश टॅंक मध्ये वन्यजीव असलेले दुर्मिळ मऊ पाठीचे कासव पाळल्याची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी छापा घालून हॉटेल मालक विजय बबन शिंदे राहणार हरचंदी मोरेवाडी यांच्या ताब्यातून फिश टॅंक मध्ये ठेवलेले मऊ पाठीचे कासव ताब्यात घेतले तसेच सदर हॉटेल मालकावर वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत वन गुन्हा दाखल केला आहे सदरची कारवाई वन विभागाच्या उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली महाबळेश्वर वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश महांगडे तापोळा वनपाल अर्चना शिंदे. महाबळेश्वर वनपाल सहदेव भिसे वनरक्षक अभिनंदन सावंत लहू राऊत विलास वाघमारे संदीप पाटोळे रेश्मा कावळे मीरा कुटे श्रीनाथ गुळवे विश्वंभर माळझळकर यांनी केली पुढील तपास गणेश महांगडे करीत आहेत.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close