नाभिक संघटनेचे माजी तालुका अध्यक्ष व भारतीय क्रांतिकारी संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख संजय लाखे यांच्यावर हल्ला
आरोपीवर ३२४, ५०४, ५०६ अनवये चिमूर पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल
उपसंपादक:विशाल इन्दोरकर
दिनांक.२७/१०/२०२१ ला रात्री ०९:३० वाजताच्या सुमारास संतोष आईलनवार उर्फ {सत्यम टायर} यांनी सुप्रसिद्ध असलेले संजय मोतीरामजी लाखे यांच्या केशकर्तनालय दुकानात जाऊन दांड्याने प्राणघातक हल्ला चढविला व या हल्ल्यामध्ये लाखे यांचे हाथ फक्चर झाले. याची पोलिसांना माहिती मिळताच क्षणी घटनास्थळी पोलीस दाखल झाले व आरोपी घटनास्थळावरून पसार झाले लाखे हे जखमी अवस्थेत आढळताच त्यांना उपजिल्हा रुग्णालय चिमुर येथे उपचारासाठी तात्काळ दाखल करण्यात आले. लाखे हे चिमूर येथील नेताजी वार्ड मधिल सुप्रसिद्ध असे नावाजलेले असून नाभिक संघटनेचे माजी अध्यक्ष आहे. तथा भारतीय क्रांतिकारी संघटनेचे प्रसिद्धि प्रमुख असून संजय मोतीराम लाखे यांचेवर प्राणघातक हल्ला चढविला असता चिमूर शहरात मोठी खळबळ माजली आहे.अजूनही आरोपीला अटक करण्यात आली नसून आरोपीस अटक केव्हा होणार याकडे चिमूर वासिय जनतेचे लक्ष लागले आहे.