मोटेगाव – काजळसर जंगल परिसरात अवैध्य दारू पकडण्यात पोलीसांना यश

ग्रामीण प्रतिनिधी : वृषभ कामडी मोटेगाव
चिमूर तालुक्यातील मौजा मोटेगाव – काजळसर जंगल शिवारात ग्राहकांना दारू विकण्याच्या उद्देशाने काही लोकांनी दारू लपवून ठेवली आहे, अशी गुप्त माहिती मिळाल्यावरून आज दिनांक 04 मे रोजी मोटेगाव – काजळसर जंगल शिवारात धाड मारून नेरी / चिमूर पोलिसांनी २,८२,०००/- रु. चा देशी दारुसाठा जप्त केला.या कार्यवाहीमुळे अवैध दारुविक्रेते दहशतीत आले आहेत.
मौजा मोटेगाव – काजळसर जंगल शिवारात पाहिजे असलेले आरोपी नामे दिपक दुधे, व राष्ट्रपाल गेडाम, ( दोन्ही रा. मोटेगाव, ता. चिमूर ) यांनी अवैधरीत्या देशी दारू विक्रिचे उद्देशाने लपवून ठेवली होती, अशी खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाल्यावरुन आँन दि स्पाट धाड मारली व देशी दारु जप्त करण्यात यश मिळवले.यामध्ये आरोपी विरुद्ध दारूबंदी बाबत कार्यवाही केली असता ११नग खर्ड्याच्या खोक्यात प्रत्येकी ४८ नग प्रमांणे ५२८नग कोकण देशी दारु संत्रा ९९९, प्रती २५०रु. प्रमाणे. ( किं.-१,३२,०००/- रु., ) तीन नग प्लास्टिक चुंगळीत ३००नग प्रमाणे ९००नग प्रत्येकी ९० मिली. मापाच्या रोकेट देशी दारु संत्रा प्रती १५०रु. प्रमाणे १,३५,०००/- रू. तसेच एका खर्ड्याचे खोक्यात १००नग प्रत्येकी ९०मिली. मापाच्या रोकेट संत्रा देशी दारुने भरलेल्या, किं. १५,०००/- रु. असा एकूण २,८२,०००रु. चा माल मिळून आला. नमूद दोन्ही आरोपी विरुद्ध रितसर गुन्हा नोंदविण्यात येत असून सदरची कार्यवाही ठाणेदार रविंद्र शिंदे यांचे मार्गदर्शनामध्ये पोलीस स्टेशन चिमूर अंतर्गत पोलीस चौकी नेरी येथील पो.उप.नि. राजु गायकवाड, दिनेश सूर्यवंशी, सचिन साठे, चालक शरीफ शेख, सैनिक यांनी यशस्वीरीत्या पार पाडली