महिला मुक्ति मोर्चा चंद्रपूर जिल्हा तसेच शहर यांचे कडुन महात्मा गांधींना अभिवादन

मुख्य संपादक :कु. समिधा भैसारे
महिला मुक्ति मोर्चा चंद्रपूर जिल्हा तसेच शहर तर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५२ व्या जयंती निमित्य चंद्रपुर येथील जटपूरा गेट जवळील गांधीजीच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .
महिला मुक्ति मोर्चा चंद्रपूर जिल्हा तसेच शहर संघटनेने याआधी ही अनेक सामाजीक कार्य केले आहेत त्यांच्या कार्याची चर्चा शहरातील नागरीकांमध्ये आहे.
गांधी जयंती चे औचित्य साधुन महिला मुक्ति मोर्चा चंद्रपूर जिल्हा तसेच शहर पदाधिकाऱ्यांनी गांधीजी चे विचार आत्मसात करुण यापूढे त्यांच्या विचारांनी संघटनेसाठी कार्य करू अशी शपथ घेण्यात आली .
यावेळी ऍड. मदन भैसारे चंद्रपूर जिल्हा विधी सल्लागार , अजय गोवर्धन जिल्हा महासचिव , मारोती आत्राम जिल्हा सहसचिव , चंद्रपूर शहर अध्यक्षा श्वेताताई फंदी , शहर महासचिव किर्तीताई गुरुनुले , शहर संघटक प्रतिभाताई मडचापे , वैशाली शेंडे ,शहर सहसंघटक सिमा वानखेडे व संगीता मामिडवार उपस्थित होते.