येंन्सा येथे शिवसेनेच्या वतीने आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी व चष्मा वितरण शिबिर संपन्न

तालुका प्रतिनिधी :ग्यानीवंत गेडाम वरोरा
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख आद.उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना जिल्हा चंद्रपूर तालुका वरोरा व लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिर संपूर्ण वरोरा तालुक्यातील गावामध्ये गाव वासियांच्या सेवे करिता आरोग्य तपासणी, नेत्र परीक्षण व औषधी वाटप शिबिराचे आयोजन केलेले आहे. या शिबिरामध्ये आरोग्य तपासणी करून मोफत औषधी दिल्या गेली. व डोळ्याची तपासणी करून अवघ्या 90 रुपयात चष्मा बनवून देण्यात आला. लांबचा व जवळचा दोन्ही एकत्र 180 रुपयात ग्रामीण भागातील जनतेची सेवा करण्याच्या उद्देशाने बनवून देण्यात आला.शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आले.शिवसेना , जिल्हा चंद्रपूर वरोरा तालुका तर्फे आयोजित शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर तथा जिल्हा खनिज प्रतिष्ठान सदस्य चंद्रपूर नितीनभाऊ मत्ते यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य नेत्र तपासणी शिबीर व आरोग्य तपासणी शिबीराच्या 33व्या दिवशी येन्सा येथील विठ्ठल रुख्मिणी मंदिर देवस्थान येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये येंसा येथील गावकरी तसेच आजूबाजूच्या परिसरातील अनेकांनी आरोग्य मोफत तपासणी व नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेतला यावेळी प्रामुख्याने मुकेश जिवतोडे शिवसेना तालुकाप्रमुख वरोरा,शिवसेना नगरसेवक दिनेश यादव, शिवसेना विभाग प्रमुख येन्सा विशाल शेंडे,शिवसैनिक अतुल नांदे व येंसा गावातील शिवसैनिक व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थिती होती.