ताज्या घडामोडी

राष्ट्रीय पेशंन योजना NPS हटाव यासाठी सावली तालुक्यातील ग्रामसेवकांचे आंदोलन

मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन शाखा सावली च्या ग्रामसेवक युनियनी आज दि. 29 ऑक्टोबर ला पंचायत समिती सावली समोर राष्ट्रीय पेन्शन योजना हटवा व जुनी पेन्शन योजना राबवा आणि अनेक मागण्या संदर्भात एक तास आंदोलन केले

ग्रामसेवक युनियन सावली तालुका संघटनेच्या वतीने NPS हटवा म्हणजे राष्ट्रीय पेन्शन योजना हटवा यासाठी हटवा दिन म्हणून सकाळच्या पहिल्या सत्रात 1 तासाचे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले यात जुनी पेन्शन योजना राबवावी आणि लागू करावी ही प्रमुख मागणी घेऊन आंदोलन करण्यात आले तसेच जुनी पेंशन योजना सुरू करावी अशी शिफारस सर्व राज्यात करण्यात आली परंतु महाराष्ट्र राज्यात करण्यात आली नाही तेव्हा ती शासनाने करावी अश्या अनेक मागण्या घेऊन आंदोलन करण्यात आले

यावेळी श्री.भाग्यवान शेंडे,अध्यक्ष, हर्षणा बागडे उपाध्यक्ष, श्री तुषार सहारे, सचिव श्री आशिष आकनुरवार कोषाध्यक्ष, श्री विपीन वाकडे संघटक, कु.पल्लवी चौधरी, कू चंद्रप्रभा वाघ, श्री उमेश रामटेके, श्री नागदेवते, श्री करुणाकर कुंभारे, श्री मनोज ननावरे,श्री हरमवर, श्री मंदाडे व सावली तालुक्यातील इतर ग्रामसेवक उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close