निवडणूक कर्तव्यवर असणारे मतदान अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण स्थळी बजवला मतदानाचा हक्क
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी विधानसभा मतदारसंघात निवडणूक कामासाठी मतदान अधिकारी म्हणून पाथरी मतदार संघात निवडणूक कामा साठी नियुक्त झालेल्या परभणी, जिंतूर, गंगाखेड,पाथरी या मतदारसंघात कार्यरत असणाऱ्या कर्मचार्यांना दुसरे प्रशिक्षणाच्या ठिकाणी शासकीय नवीन गोदाम विटा रोड पाथरी येथे ज्या कर्मचाऱ्यांचे परभणी परभणी जिल्ह्यातील मतदार संघात ज्यांचे नाव मतदार यादीत असून त्यांनी निवडणूकीच्या पहिल्या प्रशिक्षणाच्या वेळी फॉर्म नंबर 12 भरून टपाली मत पत्रिकेची मागणी केली होती असे कर्मचाऱ्यांना आपले मतदानाचे हक बजावता यावा म्हणून निवडणूक विभागाने त्यांना टपाली मतपत्रिका उपलब्ध करून दिली व त्याच ठिकाणी त्यांना तालुका (मतदारसंघ)निहाय पुलिंग बूथ उभारून मतदान करण्याची सुविधा निवडणूक विभागाकडून करून देण्यात आली या मुळे मतदान अधिकार्यांना आपले मतदानाचे हक्क बजावता आले.