महाराष्ट्रातील सर्व राज्य ग्रामसेवकांचे कामबंद आंदोलन
मुख्य संपादक :कु. समिधा भैसारे
महाराष्ट्रातील सर्व राज्य ग्रामसेवक युनियन पदाधिकारी जिल्हा अध्यक्ष सचिव तालुकाध्यक्ष सचिव यांना राज्य ग्रामसेवक युनियन पदाधिकारी मंडळ यांचे कडून कळविण्यात आले की, औरंगाबाद येथील आमदार संजय शिरसाट यांनी ग्रामसेवका बद्दल अपमानास्पद शब्द वापरून ग्रामसेवकांचा अपमान केलेला आहे त्या अपमाना बद्दल ग्रामसेवक संघटनेमध्ये तीव्र नाराजी निर्माण झालेली आहे.
दिनांक९/११/२१ रोजी एक दिवसाचा कडकडीत बंद करून यांचा जाहीर निषेध करावा त्यांनी विनाअट माफी मागावी याकरिता राज्यभर आंदोलन छेडले जाणार आहे तसेच तालुका स्तरावर माननीय तहसीलदार गटविकास अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन निषेध करावा आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची तात्काळ मागणी करावी जिल्हा स्तरावर माननीय जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांना निवेदन देऊन निषेध करावा आणि गुन्हा नोंद करण्याची मागणी करावी या गोष्टीचा निषेध म्हणून राज्यातील 27 हजार 536 ग्रामपंचायतीचे कामकाज ग्रामसेवक बंद ठेवतील काळ्या फिती लावून निषेध लोकशाही मार्गाने नोंदवतील अशा प्रकारचं आंदोलन राज्य ग्रामसेवक युनियन मार्फत आदेशित करण्यात आले आहे याबाबतचं पत्र सकाळी अकरा वाजेपर्यंत आपणास सोशल मीडियावर अग्रेषित केलं जाईल आपण सुद्धा आपल्या जिल्ह्यात तालुक्यात सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया फेसबुक ट्विटर व्हाट्सअप याठिकाणी याबाबतीत चा निषेध करून प्रसिद्धी द्यावी अशा प्रकारची माहीती एकनाथ ढाकणे, प्रशांत जामोदे, संजीव निकम राज्य ग्रामसेवक युनियन पदाधिकारी मंडळ यांनी राज्यातील जिल्हा व तालुका युनियन ला दिली आहे.