ताज्या घडामोडी

पाथरी येथे अत्यल्प दरात 110 पिठाच्या गिरणीचे वाटप

पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीचा पुढाकार.

आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या संकल्पनेतून लाभार्थ्यांना मिळणार रोजगार.

जिल्हा प्रातिनिधी : अहमद अन्सारी परभणी

आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या संकल्पनेतून आणि कृषी उत्पन्न बाजार समिती पाथरी यांच्या पुढाकाराने तालुक्यातील शेतकरी कुटुंबासाठी अत्यल्प दरात 110 पिठाची गिरणी वाटप करण्यात आली हा महत्त्वपूर्ण निर्णय रोजगार उपलब्धीला बळकटी देणारा आहे.
पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिलराव नखाते ,उपसभापती एकनाथराव शिंदे व सर्व संचालक मंडळाच्या वतीने शेतकरी यांच्यासाठी विविध योजना राबवून शासनाच्या सवलती सह शेतीमाल खरेदी प्रक्रिया उत्तम प्रकारे कार्यरत ठेवलेली आहे आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी शेतकरी कुटुंबियांना आर्थिक उत्पन्नात वाढ व्हावी याकरिता सबसिडी तत्त्वावर माफक दरात 110 पिठाच्या गिरणीच्या वाटपाची संकल्पना मांडली या संकल्पनेची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने अंमलबजावणीसाठी पुढाकार घेत पाथरी तालुक्यात 110 पिठाच्या गिरणी चे वाटप केले आहे .विशेष म्हणजे या पिठाच्या गिरणीतून गहू ज्वारी बाजरी चे दळण होते तर सर्व दाळीचे दळण सुद्धा या गिरणीतून निघते तसेच विविध मसालाही या गिरणीतून तयार केला जातो अशा या गिरणीची बाजार भावात 21 हजार 500 रुपये किंमत असली तरी कोरीटीक इंडस्ट्रीज बारामती येथील प्रशांत पवार त्यांचे सोबत ना नफा ना तोटा या पद्धतीने करार करून शेतकऱ्यांसाठी सबसिडी तत्वावर ती केवळ 10500 रुपयाला दिली आहे या 10 जून रोजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या हस्ते सौ विमल यशवंत हरकळ रेनाखळी यांना ही पिठाची गिरणी वितरित करण्यात आली या प्रसंगी बाजार समितीचे सभापती अनिलराव नखाते, उपसभापती एकनाथराव शिंदे, जिपचे माजी सभापती दादासाहेब टेंगसे राजेश ढगे सुनील उन्हाळे दगडू पटणे यांची उपस्थिती होती.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांच्या कुटुंबात रोजगार उपलब्ध होऊन आर्थिक उत्पन्न वाढीसाठी पुढाकार घेतला याबद्दल आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी बाजार समिती प्रशासनाची प्रशंसा केली.
पाथरी बाजार समितीच्या वतीने पुढाकारातून तालुक्यातील 110 शेतकऱ्यांना स्वस्त दरात ही पिठाची गिरणी मिळाल्याने त्यांच्या उत्पन्नात निश्चितच भर पडणार . ग्रामीण भागात गहू ज्वारी तांदूळ याशिवाय दाळीच्या दळणा साठी व मसाला तयार करण्यासाठी ही गिरणी उपयुक्त ठरणार आहे आहे बाजार समितीचा हा उपक्रम आदर्शवत म्हणावा लागेल.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close