ताज्या घडामोडी

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्य राष्ट्रीय एकात्मतेसाठी धावले नागरिक

ग्रामीण प्रतिनिधी: सुनिल गेडाम सिरपूर

चिमूर मुख्यालयापासून जवळ असलेल्या शिरपूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात सोमवार दिनांक 31/10/2022 रोजी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान आयर्न लेडी प्रियदर्शिनी इंदिराजी गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्य आणि भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिरपूर ग्रा. पं. चे सचिव श्री. लोकचंदजी भसारकर यांनी राष्ट्रीय एकात्मितेची शपथ दिली व एकता दौड घेऊन प्रियदर्शिनी इंदिराजी गांधी यांची पुण्यतिथी आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाला उपस्थित ग्रा. पं. शिरपूरचे सरपंच सौ. वैशालीताई निकोडे व ग्रामसेवक श्री. लोकचंदजी भसारकर साहेब यांच्या हस्ते सर्वप्रथम इंदिराजी गांधी व लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
केंद्र सरकार व राज्य शासनाने निर्गमित केलेल्या पत्रकानुसार 31 ऑक्टोम्बर हा दिवस ” राष्ट्रीय एकता दिन ” म्हणून साजरा करण्यात आला.या प्रसंगी ग्रा. पं. शिरपूरचे ग्रामसेवक श्री. लोकचंदजी भसारकर साहेब यांनी सरदार वल्लभभाई पटेल व इंदिराजी गांधी यांच्या जीवनावरती प्रकाश टाकत त्यांनी केलेल्या भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेतील अतुलनीय कार्याचा गौरव करतांना राष्ट्रीय एकता आपल्यामध्ये टिकून राहावी यासाठी एक ब्रिदवाक्य सांगितले.
“राष्ट्रीय एकता हमारी आन,
मिटने न पाये देश कि शान!
राष्ट्रीय एकता है हमारा सन्मान
यही है हमारे देश कि पहचान!!
यावेळी ग्रा. पं. चे उपसरपंच श्री. राजेंद्र भानारकर, ज. म. से. सह. संस्थेचे सचिव श्री. दिवाकरजी डहारे, शिरपूर येथील पोलीस पाटील श्री. मंगेशजी भानारकर, वनहक्क समितीचे अध्यक्ष श्री. सुनिलभाऊ गेडाम, माजी तं. मु. स. अध्यक्ष श्री. विलासराव बोरकर, ग्रा. पं. सदस्य श्री. जीवनभाऊ बोरकर, ग्रा. पं. कर्मचारी श्री. गोपालजी गावतुरे, पाणी पुरवठा कर्मचारी मोहन बोरकर, जिल्हा परिषद शाळेतील विध्यार्थी व शिक्षकवृंद, आरोग्य सेविका कोवेताई, अंगणवाडी सेविका तथा मदतनीस, तसेच ग्रा. पं. चे सर्व सदस्यगणं व गावातील नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.
.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close