ताज्या घडामोडी
ब्रम्हपुरी विधानसभक्षेत्रातून सलग तिसऱ्यांदा मा. विजय वडेट्टीवार यांचा विधानसभेवर विजय

तालुका प्रतिनिधी:सनम रा. टेंभुर्णे
महाराष्ट्र विधानसभा २०२४ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातून ११४१९६ मते घेऊन विजय नोंदवला. व त्यांनी आपला गढ विजयी राखला. आणी ब्रम्हपुरी मतदारसंघातील जनतेने त्यांना पुन्हा विधानसभेत पाठवले. तसेच भाजपचे कृष्णालाल सहारे १००२२५ मत घेऊन दुसऱ्या क्रमांकावर राहिले. सुरुवातिच्या फेरीला सहारे यांनी चांगली टक्कर दिली. परंतु वडेट्टीवार यांनी अनेक ब्रम्हपुरीत मतदारसंघात कोट्यावधीचे विकासकामे केल्याने व उत्तम संघटन कौशल्य. तसेच सर्व समाजाला पक्षाशी जोडून ठेवल्याने त्यांना विजय प्राप्त झाला असा जनतेचा म्हणणा आहे.