ताज्या घडामोडी

पुण्यात 5 मे रोजी परीवार कल्याण परिषद

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

कायद्याच्या वाढत्या गैरवापरामुळे अनेक परिवार -कुटुंब उध्वस्थ होत असून धोक्यात आली आहे. गेल्या काही वर्षापासून एक प्रकारे कौटुंबिक दहशतवाद फोफावत असून त्यामुळे परिवार संस्थेची -कुटुंब संस्थेची मृत्यूघंटा वाजू लागली आहे. त्यातच सध्या मोबाईल आणि सोशल मिडीयाच्या अति वापरामुळे परिवारातील सदस्यांमध्ये संवाद अतिशय कमी झाला असून लहान मुले, वयोवृद्ध यांच्यावर देखील विपरीत परिणाम होताना दिसतो. लहान मुले, युवा वर्ग काही प्रमाणात भरकटतोय याची जाणीव स्पष्ट झालेली आहे. पुरुषांच्या आत्महत्या देखील जास्त प्रमाणात वाढताना दिसत आहेत. सध्या संसाराचा गाडा ओढण्याच्या नावाखाली वाढलेला चंगळवाद आणि जुन्या पिढीला त्यांच्या विचाराना तसेच संस्कृतीला फाटा देण्याची विचारशैली आणि शिक्षणाच्या स्वैराचारामुळे सुरु असलेल्या स्पर्धेमुळे परिवारात संवाद कमी झाल्याने राहणीमान, खाण -पान बदलले असल्याने अनेक गंभीर तसेच दुर्धर आजारांना देखील सामोरे जावे लागत आहे. परिणामी परिवार संस्था, कुटुंब संस्था आणि विवाह व्यवस्था टिकण्यासाठी परिवार संस्था वाचविणे तसेच परिवार कल्याणासाठी कटिबद्ध भारतातील पहिली नोंदणीकृत संस्था म्हणजे फॅमिली वेलफेर रिसर्च अँड ट्रेनिंग सोसायटी या आमच्या सामाजिक संस्थे‌द्वारा ५ मे २०२४ रोजी उ‌द्यान प्रसाद कार्यालय, खजिना विहीर चौक, टिळक रोड, पुणे-३०. येथे संस्थेचे पहिले राष्ट्रीय अधिवेशना निमित्त सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत दोन सत्रात परिवार कल्याण परिषदेचे आयोजन केले आहे. अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव अॅड. संतोष शिंदे व संस्थेच्या पदाधिकारी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
या परिषदेसाठी महाराष्ट्रातून तसेच महाराष्ट्रा बाहेरून देखील परिवार संस्था वाचवण्यासाठी कार्यरत अश्या काही सामाजिक संस्था व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत प्रचलित कौटुंबिक कायट्‌यांची माहिती देण्यात येणार असून परिवाराच्या कल्याणासाठी घ्यायची काळजी आणि परियोजना याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच परिस्थितीवर मात करून परिवार संस्था टिकवण्यासाठी कार्यरत काही जोडप्यांचा सन्मान देखील करण्यात येणार आहे. भविष्यात राज्यघटनेतील समान न्याय तत्वानुसार परिवारातील पती -पत्नी, सासू -सून, ननंद -भावजय, दीर, सासरा, नणंदावा, लहान मुले, परिवारातील अन्य सर्व नातेवाईक तसेच जेष्ठ नागरिक ई. सर्वासाठी एकच असा परिवार आयोग गठीत व्हावा यासाठी देखील चर्चा व प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच परिवारातील वाढते क्लेश आणि समस्यांचे निराकरण करण्यासाठी समुपदेशन केंद्र सुरु करून याबाबत संशोधन करून त्याकरिता कोणत्या प्रकारे प्रशिक्षण द्यायचे याबाबत देखील चर्चा होणार आहे.
वास्तविक पाहता सध्या काय‌द्याचा होणारा दुरुपयोग व त्यामुळे उध्वस्थ होणारी कुटुंब – परिवार संस्था वाचवण्यासाठी तसेच विवाह व्यवस्था टिकावी, किरकोळ कारणावरून वाढणा-या घटस्फोटांचे प्रमाण कमी व्हावे, लहान मुलांची फरफट थांबावी, संस्थेच्या माध्यमातून परिवारातील प्रत्येकाला समुपदेशन मिळणे साठी समुपदेशन करणे, भारतीय संस्कृतीचे जतन व्हावे याकरिता आम्ही कार्यरत आहोत. त्याच प्रमाणे गरजू, निराधार वयोवृद्ध आणि मुले यांना राहण्यासाठी निवारा उपलब्ध व्हावा तसेच गरजू स्त्री-पुरुषांना तसेच युवा वर्गाला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून युवा वर्गाला शैक्षणिक तसेच नोकरी व व्यावसाईक मार्गदर्शनासोबत शेतकरी आणि कामगार वर्गाला मार्गदर्शन तसेच गरीब कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या सोई-सुविधा उपलब्ध होण्यासाठी, तसेच सध्या मोबाईलच्या अति वापरामुळे निर्माण होत असलेल्या समस्या तसेच दारू गुटखा इत्यादी व्यसनाबाबत तसेच अन्य सामाजिक विषयाबाबत जनजागृतीसाठी आमची संस्था प्रयत्नशील आहे. तरी ५ मे २०२४ रोजी होणा-या परिवार कल्याण परिषदेचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा व काही सूचना असल्यास आम्हास जरूर कळवाव्यात त्यासाठी संपर्क क्र- ७५०७००४६०६ यावर संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेचे संस्थापक सचिव अॅड. संतोष शिंदे व संस्थेच्या पदाधिकारी यांनी केले आहे.
संस्थेच्या राष्ट्रीय अधिवेशना निमित्त परिवार कल्याण परिषदेच्या यशस्वितेसाठी संस्थेच्या अध्यक्षा सौ. प्रतिभा शिंदे, उपाध्यक्ष तेजस नाईक, खजिनदार जयेश अहिरे, सदस्य पावन अंभोरे, सौ. ज्योती अहिरे, सौ. सविता शिंदे, तसेच अनिकेत भालेराव, आशिष गरुड, अविनाश पवार, निनाद शिंदे, संस्थेचे मार्गदर्शक तथा पुरुष हक्क संरक्षण समितीचे संस्थापक ऍड.धर्मेंद्र चव्हाण साहेब, संस्थेच्या मार्गदर्शिका सौ. तेजस्विनी मरोड मॅडम, सौ. आरतीताई कोशे, प्रसाद पंचपोर, सचिन वनकर, प्रशांत कदम, योगेश बांदल, सकेत गाडे, अमित सिन्हा, शरद पाटील, धनंजय खटावकर आदी परिश्रम घेत आहेत.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close