बोरगव्हाण शाळेत जिजाऊ जंयती विविध उपक्रमासह संपन्न
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
जि.प.आंतरराष्ट्रीय प्राथमिक व माध्यमिक शाळा बोरगव्हाण येथे 12 जानेवारी रविवार रोजी
जिजाऊ जयंती निमित्त वकृत्व स्पर्धा तसेच रंगा रंग कार्यक्रम घेण्यात आले.
जिजाऊच्या वेशभूषेत आलेल्या सर्व मुलींचा व विविध स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व मुला मुलीचा शाळेचे मुख्याध्यापक बजरंग गिलडा, निपाणीकर सर, राऊत सर, तायनाक सर, वाघमारे मॅडम, शालेय व्यवस्थापन समीती चे नुतन अध्यक्ष विनायक इंगळे, उपाध्यक्ष नागनाथ कदम, तसेच चिंचाणे काका, गोंगे, भारत इंगळे, भागवत इंगळे, उत्तम इंगळे यांच्या हस्ते बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच सर्वांना नुतन शालेय व्यवस्थापन समिती मार्फत नाश्ता व खारीक वाटप करण्यात आली.
या कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समिती चे नुतन अध्यक्ष विनायक इंगळे ,उपाध्यक्ष नागनाथ कदम तसेच सर्व सदस्य, शिक्षक विद्यार्थी पालक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.