ताज्या घडामोडी

श्री सिध्देश्वर माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन ऑनलाइन संपन्न

जिल्हा प्रतिनिधी :अहमद अन्सारी परभणी

दि. २१ ते २८ योग सप्ताह प्रारंभ
जागतिक योग दिन श्री सिध्देश्वर माध्यमिक विद्यालय माजलगाव येथे ऑनलाइन संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरुवात बलाचे उपासक हनुमानाच्या प्रतिमेचे पूजन करून झाले.
गुगल मिट द्वारे ऑनलाइन योग दिन कार्यक्रमात श्री सिध्देश्वर शैक्षणिक संकुलाचे सर्व संस्था पदाधिकारी, उपमुख्याध्यापक ,सर्व पर्यवेक्षक ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी,पालक ऑनलाइन जॉइंन होउन योग दिन कार्यक्रमात सहभागी झाले होते. प्रतिनिधिक स्वरूपात शाळेचे मुख्याध्यापक बाबुराव आडे गुरुजी, योग शिक्षक रविंद्र खोडवे, योग प्रमुख सुरेश रोकडे, क्रिडाशिक्षक पंडित मेंडके,कमलाकर झोडगे, रामेश्वर कुंभार, शिवशंकर भंडारे, उपस्थित होते.
यावेळी मुख्याध्यापक बाबुराव आडे गुरुजी यांनी मानवी जीवनात योग व ध्यानाचे महत्व अनन्य साधारण आहे, तो आपण आयुष्यभर सातत्याने केले पाहिजे, तसेच योग सप्ताहाचे उदघाटन झाले असे जाहीर केले. पंडित मेंडके यांनी योग दिन कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन केले, रविंद्र खोडवे यांनी योग प्रात्यक्षिके करुन घेतले, यामध्ये वज्रासन, वृक्षासन, ताडासन, बैठे आसन प्रकार व ध्यान, अनुलोम विलोम, भ्रामरी असे विविध प्रकारचे प्राणायाम करून घेतले, शांती मंत्राने या योग दिनाचे सांगता झाली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close