ताज्या घडामोडी
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठामध्ये झाडांची कत्तल
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
परभणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठास नुकताच हरित विद्यापीठ पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे परंतु काही दिवसापासून विद्यापीठामध्ये बेसुमार झाडांची कत्तल फॉरेस्ट विभागाची कोणतीही परमिशन न घेता सुरू करण्यात आलेली आहे
एकीकडे शासन झाडे लावण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि परभणी मराठवाडा कृषि विद्यापीठातील कुलगुरू इंद्रमनी यांच्या कार्यकाळात आ खूप मोठी वृक्षतोड चालू आहे वृक्ष मित्रांकडून परभणीतील सुजाण नागरिकांकडून व विद्यापीठ परिसरातील विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे झाडे तोडणाऱ्यांना कोणते अधिकारी सहकार्य करीत आहेत
त्यांना कोणाचा पाठिंबा आहे या विरोधात लवकरच वृक्ष मित्र संघटनेच्या वतीने विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे.