पंचायत समिती मुल परिसरात बार्टी पुणे अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम
तालुका प्रतिनिधी : हेमंत बोरकर मुल
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था बार्टी पुणे अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात लोकसहभागातून 5 जून ते 25 जून 2021 या दरम्यान वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. वाढते प्रदूषण व सध्याची कोविड परिस्थिती यामुळे असंख्य नागरिकांना अक्सिजन अभावी आपले प्राण गमवावे लागले. म्हणूनच वृक्षारोपण काळाची गरज ओळखून बार्टी पुणे च्या संकल्पनेतून प्रती समतादूत 50 ते 100 झाडे लावण्याचे उद्धिष्ट ठेवण्यात आले त्याचाच एक भाग म्हणून समतादूत श्री.उपेंद्र वनकर तालुका मुल यांनी पंचायत समिती मुल कार्यालय परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले. श्री. चंदुभाऊ मारगोणवार सभापती पंचायत समिती मुल व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. सभापती महोदयांनी बार्टीकृत या उपक्रमाला आपल्या शुभेच्छा दिल्या व एक व्यक्ती एक झाड लावण्याचे नागरिकांना आवाहन केले.