ताज्या घडामोडी

पाथरी येथे शुन्य ते 5 वर्ष वयोगटातील बालकांच्या नि:शुल्क आधार नोंदणीसाठी विशेष मोहीम

‘‘पहिले पाऊल, आधार कार्ड घेऊन’’

पाथरी शहरातील साई नगर पुरा येथील अंगणवाडी येथून सुरुवात.

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

आधार सुपरवायझर शिवकण्या तुकाराम पौळ व अंगणवाडी ताई संजूबाई काळे यांनी कॅम्प यशस्वी केला
विविध शासकीय व निमशासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी सद्या आधार कार्ड गरजेचे झाले आहे. त्यामुळे ‘‘पहिले पाऊल, आधार कार्ड घेऊन’’ या घोषवाक्याने परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात 0 ते 5 वयोगटातील बालकांच्या विशेष आधार नोंदणी शिबीरांचे आयोजन करण्‍यात आले असून बालकांच्या नवीन नि:शुल्क आधार कार्ड नोंदणीसाठी विशेष मोहीम पाथरी तालुक्यात 15 दिवस सुरू राहणार आहे. अशी माहिती आधार केंद्र चालक तुकाराम पौळ यांनी दिली
नागरिकांना बालकांचे आधार कार्ड काढण्‍याकरीता दैनंदिन कामकाजातून वेळ मिळत नाही. नागरिकांची आधार कार्डसाठी धावपळ व गैरसोय होऊ नये
विशेष मोहीमेच्‍या अंतर्गत अंगणवाडीस्‍तरावरच आधार कॅम्‍पचे नियोजन करण्‍यात आलेले आहेत. जिल्ह्यातील 0 ते 5 वयोगटातील सर्व बालकांची नोंदणी पूर्ण होण्‍यासाठी बालविकास प्रकल्‍प अधिकारी,व आधार केंद्र यांना निवडण्यात आले नवीन आधार कार्ड नोंदणी नि:शुल्‍क असून, १ ते १५ जुलै, २०२२ या कालावधीत नोंदणी नियोजीत वेळापत्रकाप्रमाणे पुर्ण करण्‍यात येणार आहे.
विशेष मोहीम यशस्‍वी राबविण्‍याकरीता बालकांचे जन्‍म प्रमाणपत्र व नोंदणी करतांना बालकांचे आई किंवा वडील सोबत असणे गरजेचे आहेत, अशा सुचना देवून अंगणवाडीच्‍या ठिकाणी आवश्‍यक असलेली यंत्रणा, व्‍यवस्‍था आदीबाबत सविस्‍तर माहिती यावेळी देण्‍यात आली .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close