पिक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यास पोलीस ठाण्यात डांबले
शिक्याचा गैरवापर करणारे तालुका कृषी अधिकारी वर गुन्हा दाखल करण्याची मागनी
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
रिलायन्स पिक विमा कंपनीच्या पालम रोड वरील कार्यालयात बनावट पोचपावती देत असल्याच्या संशयावरून शेतकऱ्यांनी रिलायन्स पिक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यास गुरूवारी गंगाखेड पोलीस ठाण्यात नेऊन डांबले ,आपल्या अधिकाराचा गैरवापर करून करणाऱ्या तालुका कृषी अधिकारी सुरेश मस्के यांच्यावर गुन्हा नोंदवीण्याची मागणी सखाराम बोबडे पडेगावकर आणि जयदेव मिसे यांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
दोन दिवसापूर्वी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. शेतकऱ्यांनी पीक विमा काढल्यामुळे पावसामुळे नुकसान झाल्याच्या तारखेपासून 72 तासाच्या आत पिक विमा कंपनीकडे तक्रार करणे आवश्यक आहे असा नियम आहे. या नियमाच्या भीतीने शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. ॲप चालत नसल्यामुळे ऑनलाईन तक्रारी होत नव्हत्या. टोल फ्री नंबर वर फोन लागत नव्हता .शेवटी कंटाळून कालपासून शेतकऱ्यांनी रिलायन्स पिक विमा कंपनीचा कार्यालयात नुकसानीचे तक्रार देण्यास सुरुवात केली. काही शेतकऱ्यांनी अर्जाची पोचपावती मागितल्यास शिक्का नसल्याचे कारण रिलायन्स पिक विमा कंपनीचे अधिकाऱ्याकडून सांगण्यात येत होते. आज 9 रोजी सकाळी शेतकरी पिक विमा कंपनीच्या कार्यालयात तक्रार अर्ज देण्यासाठी गेले असता रिलायन्स कंपनीचे अधिकारी मोरे हे पोच पावतीवर रिलायन्स विमा कंपनीचा शिका देण्याऐवजी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात शिक्का देत असताना आढळून आले. यावर साखराम बोबडे यांनी पोलिस निरीक्षक बोरगावकर मॅडम यांना ही माहिती कळवली. शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनी अधिकाऱ्यास पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जा अशी मागणी घटनास्थळी उपस्थित झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याकडे केली .यावरून शेतकरी व पोलिस कर्मचाऱ्यांनी पिक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांची पोलीस स्टेशनमध्ये आणले .घटनास्थळी उपस्थित असलेल्या शेतकरी सखाराम बोबडे पडेगावकर व जयदेव मिसे तालुका कृषी अधिकारी सुरेश मस्के यांना फोन करून आपण स्वतःहून फार्म स्वीकरावेत अशी विनंती केली होती. शेवटी पोलीस ठाण्यात शेतकरी जमा झाल्यानंतर तालुका कृषी अधिकारी सुरेश मस्के है उपस्थित झाले. पोलिस शेतकरी आणि कार्यकर्ते यांच्या चर्चेतून पोलीस ठाण्यात अर्ज स्वीकारण्याचे ठरले. पण मागील दोन दिवस तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाचा शिक्का इतरांना वापरायला देऊन तालुका कृषी अधिकारी सुरेश मस्के यांनी शासनाची फसवणूक करून आपल्या अधिकाराचा गैरवापर केला . त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडे, माजी सरपंच जयदेव मिसे यांनी उपविभागीय अधिकारी मार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. त्याच्या प्रती पोलीस ठाणे गांगाखेड तहसीलदार गंगाखेड यांना देण्यात आले आहेत.