ताज्या घडामोडी

बाबासाहेबांना अपेक्षित विद्यार्थी हा चिकित्सक वृत्तीचा व स्वतंत्र विचार करणारा असावा

ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी

बार्टी तर्फे शिवापूर बंदर येथे विद्यार्थी दिन साजरा
शिका संघटित व्हा आणि संगर्षं करा अशा क्रांतीचा सिद्धांत मांडणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वात जास्त महत्व हे शिक्षणाला दिले त्यामुळे बाबासाहेब ना विद्यार्थ्यां बद्दल खूप अपेक्षा होत्या . विद्यार्थी यांनी जास्तीजास्त ज्ञान संपादन करण्यासाठी वाचन करणे आवश्यक आहे . विद्यार्थ्यांनि बुद्धीला चालना देऊन बौध्दिक शक्तीचे संवर्धन केले पाहिजे व विवेक शक्ती प्रज्वलित करून आपल्या बुद्धिमतेत व कार्यक्षमतेत कमी पडणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. शिक्षणात शिलाला फार महत्व असायला हवे . विद्यार्थी हा दीर्घोद्योगी असला पाहिजे विद्यार्थीनि आपल्या जीवनात आत्मविश्वास वाढविला पाहिजे कोणाचेही अंधानुकरण करू नये दिव्य दृष्टी विद्यार्थी कडे असायला हवी , नवीन जीवन मूल्ये ओळखता आली पाहिजे प्रज्ञा व प्रतिभा विद्यार्थीनाची उच्च विचारांची असायला हवी बाबासाहेबाना विद्यार्थी हा चिकित्सक वृत्तीचा व स्वतंत्र विचार करणारा असावा अश्या प्रकारचे विद्यार्थी संपन्न समाज निर्माण करू शकतात असे प्रतिपादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे च्या समतादूत प्रज्ञा राजूरवाडे यांनी शिवापूर बंदर येथे विद्यार्थी दिन साजरा करण्यात आला त्यावेळी आपल्या प्रमुख मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना बाबासाहेबांच्या शाळा प्रवेश दिनानिमित्त विद्यार्थी हे बाबासाहेबांना कसल्या प्रकारचे अपेक्षित आहे यावर मार्गदर्शन करत असताना बोलत होत्या.

त्यानी यावेळी बार्टी च्या युवा केंद्र स्पर्धा परीक्षा व बार्टी च्या विविध योजनेची तसेच सामाजिक न्याय विभागाच्या योजनेची सुद्धा माहिती त्यानी यावेळी दिली या कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामपंचायत शिवापूर बंदर चे उपसरपंच आदित्य वासनिक, मूकनायक फौंडेशन चे प्रकाश मेश्राम , मिथुन शोगावकर , निखिल ननावरे आदि प्रमुख पाहुणे उपस्थित या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सृजन मेश्राम यांनि केले तर आभार विशाल यांनी मानले या वेळू या कार्यक्रमाला उपस्थित गावातील विद्यार्थी संख्या भरपूर प्रमाणात उपस्थित होती.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close