ताज्या घडामोडी

बंदर (शिवापूर) येथे अवैध सागवान साठ्यावर वनविभागाची धाड

चिमुर वनविभागातील खडसंगी उपवनक्षेत्रातील बंदर येथील घटना

तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर

कोरोना काळात सर्वत्र लाकडाऊन शासनाने केले असल्याने, हाताला कोणतेही काम नाही. हातात रोजगार होता तो हि गेला. अनेकांवर बेरोजगार होण्याची पाळी आली. त्यामुळं अनेकांचे असे चोरीचे प्रमाण वाढलेले आहेत. कोरोना संसर्ग काळात अनेकजण रेती तस्करी, सागवान तस्करी तर कुठं दारू तस्करी चे प्रमाण अत्यंत वाढलेले आहेत. याकडे शासनाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
चिमुर प्रादेशीक वनविभागा अंतर्गत खडसंगी उपवन क्षेत्रातील ब़ंदर (शिवापूर) गावात गुप्त माहीतीच्या आधारे रात्री 12 वाजताच्या दरम्यान अवैद्य सागवान तस्करांच्या घरी धाड टाकण्यात आली. यावेळी आरोपी सृजल मेश्राम राहणार बंदर (शिवापूर) अविनाश सती कोसरे (खडसंगी) सुरेश खडसान (खडसंगी) येथील रहिवासी असून यांच्या घरी अवैद्य सागवान असल्याचे वनविभाग यांना गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार चिमूर चे वनपरिक्षेत्र अधिकारी व गस्त पथक वन विभाग यांनी वरील आरोपीचा घरी धाड टाकली असता अवैध सागवान, पाट्या, खाटेचे ठावे व काही सागवान चे ओंडके असा माल जप्त करण्यात आला.
त्यात वनविभागाने दिलेल्या माहिती नुसार 0.179 व 0.191 घनमिटर सागवान असुन अंदाजे 15 हजार रूपयाचा अवैध सागवान माल जप्त करण्यात आला. सदर सागवान मालाचा वनविभागाद्वारे जप्त मालाचा पंचनामा करण्यात आला. असून वनविभागात मोठी खळबळ माजली आहे. आरोपीला वनविभागाने अटक करुन बयाण नोंदविण्यात आले.
ही कारवाई चिमुर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी यु.एस.नैताम, क्षेत्रसहाय्यक आर.डी. नैताम, फिरते पथकचे के.डी. गायकवाड, डी.जी मैद वनरक्षक कु. ढोके, वनरंक्षक मेश्राम आदीनी धाड टाकुन अवैध सागवान जप्त करण्यात आले. मात्र नेमका हा सागवान माल वनविकास महामंडळच्या की, प्रादेशिक वनविभागाच्या जंगलातील माल आहे का? याबाबत वनविभागाकडुन चौकशी होणार आहे.
जंगलाच्या संवर्धनासाठी शासन करोडो रुपये खर्च करतात. “जंगल वाचवा, जिवन वाचवा” असे आपण म्हणतो. पण आता जंगलाच्या संवर्धनावर मोठा प्रश्न निर्माण होत आहे. सागवान तस्करी करणारी टोळी या भागात सक्रिय झाली आहे. सागवान तस्करीचे मोठे जाळे असल्याने जंगल संकटात सापडले आहे. या सागवान तस्करातील आरोपीवर वनविभाग कोणती कारवाई करणार आहे. याकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे

प्रतिक्रीया

हे अतिशय गंभीर प्रकरण आहे. हे प्रकरण दडपण्याची शंका निर्माण झाली आहे. सागवान तस्करी करणा-यांची मोठी साखळी असू शकते. चौकशीत हयगय होऊ शकते. त्यामुळं वरिष्ठ अधिका-यांकडुन विभागीय चौकशी करण्यात यावी.

कवडु लोहकरे अध्यक्ष, पर्यावरण संवर्धन समीती चिमुर

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close