ताज्या घडामोडी
महापरीनिरवान दिनी ब्रम्हपुरीतील सगळे बौद्ध उपासिका व उपासक एकवटले

तालुका प्रतिनिधी:सनम रा. टेंभुर्णे
दिनांक ६ डिसेंबर रोजी सकाळी विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरीनिर्वान दिनी ब्रम्हपुरी येथे विविध विहारात आदरांजली वाहण्यात आली. सायंकाळ होताच सगळ्यांनी आपल्या आपल्या विहारातून दिवा घेऊन पैदल फेरी काढत सगळे उपासक व उपासिका गुजरी वॉर्ड येथील विहारात एकत्र जमा झाले. त्यामुळे मोठ्या संख्येने लोक जमा झाले. आणी सगळ्यांनी तेथील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मेणबद्दत्ती लावून आदरांजली वाहिली. नंतर तिथे समूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. अश्याप्रकारे सगळ्यांनी बाबासाहेब आंबेकर यांच्या विचारांची आठवण केली व आदरांजली वाहिली.