मतदान करा फरक पडतो तुमचे एक मत बदलून टाकेल महाराष्ट्राचे भवितव्य

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी विधानसभा 98 सार्वत्रिक निवडणूक 24 साठी मतदान जनजागृती करिता स्वीप टीम मार्फत विविध उपक्रम पाथरी विधानसभा मतदारसंघातील वेगवेगळ्या ठिकाणी जनजागृतीचे उपक्रमाद्वारे प्रशासनाकडून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून मतदार सेल्फी पॉईंट तयार करण्यात आले व याद्वारे मतदानाचे महत्त्व पटविण्यासाठी ‘ ‘ मतदान करा फरक पडतो तुमचे एक मत बदलून टाकेल महाराष्ट्राचे भवितव्य ‘असे संदेश देणारे सेल्फी पॉईंटचे उदघाटन तहसील कार्यालय पाथरी येथे श्री शंकर हांदेश्वार तहसीलदार पाथरी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी श्री वसंत महाजन नायब तहसीलदार निवडणूक श्री जामकर ,शंकर धावारे , सुधीर पाटील ,जमील सिद्दीकी इत्यादी कर्मचारी उपस्थित होते निवडणूक विभागाकडून जनजागृती चे बॅनर्स सेल्फी पॉईंट मुख्य रहादरीच्या ठिकाणी बस स्टँड पाथरी मानवत, सोनपेठ, रेल्वे स्टेशन मानवत रोड ,पंचायत समिती कार्यालय, नगरपरिषद कार्यालय, पाथरी ,मानवत,व सोनपेठ या ठिकाणी लावण्यात आले आहेत 20 नोव्हेंबर 24 रोजी मतदारांनी न चुकता मतदान करण्याचे आवाहन श्री शैलेश लाहोटी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केले आहे .