ताज्या घडामोडी

जि.प.उ.प्रा.शाळा वाघनख येथे डाॕ.पंजाबराव देशमुख यांची जयंती साजरी

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

२७ डिसेंबर १८९८ या दिवशी जन्माला आलेले भारतमातेचे सुपुत्र भारताचे पहिले कृषिमंत्री भाऊसाहेब डाॕ.पंजाबराव देशमुख यांची जयंती जि.प.उ.प्राथ.शाळा वाघनख येथे साजरी करण्यात आली याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक रामचंद्र सालेकर यांनी त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकतांना आपल्या मनोगतात सांगीतले की, डाॕ.पंजाबराव देशमुख हे कष्टकऱ्यांच्या मातीशी सच्ची नाळ जुडलेले लोकनेते होते,त्यांनी धार्मिक स्थळांच्या संपत्तीचे राष्ट्रीयकरण करुन ती गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी,त्यांच्या उद्धारासाठी खर्च करावी असे बील मांडले होते,शेतकऱ्याच्या मुलाला आरक्षण मिळाले पाहिजे हा आग्रह धरला होता. संविधानात ओबीसींच्या आरक्षणासाठी तरतुद करावी म्हणून डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांची भेट घेतली असता सुचवायच्या अगोदरच बाबासाहेबांनी ओबीसीच्या ३४० व्या कलमाचा ड्राफ्ट तयार केल्याचे बघून गहिवरुन डोळ्यात पाणी आणनारे, या देशात पहिले जागतिक कृषिप्रदर्शन भरविणारे,देशाच्या विकासासाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे ओळखून ग्रामीन भागातील गोरगरीबांच्या मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्या यासाठी आपले घर गहान ठेवून श्री शिवाजी शिक्षण संस्थांची निर्मिती करुन ३०० च्या वर ग्रामीण भागात शिक्षणसंस्था सुरु करणारे, पहिले राष्ट्रीय शैक्षणिक अधिवेशन भरवून शैक्षणिक अधिवेशनांची सुरुवात करणारे, घटना समितीचे सदस्य,भारताचे पहिले कृषिमंत्री,सहकारमंत्री,कृषि विद्यापीठाचे जनक, कृषिरत्न,शेतकयांचे कैवारी, शिक्षणमहर्षी डाॕ.पंजाबराव देशमुख यांनी देशासाठी भरीव असे योगदान देवून १० एप्रिल १९६५ ला भारत मातेच्या या सुपुत्राने अखेरचा श्वास घेतला असे सांगून आपल्या या महापुरुषाच्या स्मृतींना उजाळा दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.रेखा थुटे यांनी तर आभार प्रतिक्षा सुरकर हिने मानले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close