उमरेड येथील नवदुर्गा माता व शिवमंदीर जिर्णोद्वार सेवा मंडळनी लावले प्रेमियुगुलाचे लग्न

नेरी प्रतिनिधी : मंगेश वांढरे
उमरेड येथील नवदुर्गा माता व शिवमंदीर जिर्णोद्वार सेवा मंडळाच्या पुढाकारातुन प्रेमीयुगुल विवाह बंधनात अडकले त्यांचा विवाह लावण्यात आला. चिमुर तालुक्यातील आंबोली येथील विजय मारोती वांढरे व नागपुर जिल्ह्यातील आलागोंदी पोस्ट रामा बोरखेडी येथील शिवानी प्रेमकुमार नवघरे यांचे मागील दोन वर्षापासून प्रेमसंबध आहे. या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र कुंटुबीयांनी लग्नाला विरोध दर्शविला त्यामुळे या प्रेमियुगुलांनी उमरेड येथील नवदुर्गा माता व शिवमंदीर जिर्णोद्वार सेवा मंडळाकडे अर्ज केला आणि आपली आपबिती कथन केली. त्यानंतर जिर्णोद्वार सेवा मंडळाचे अध्यक्ष मुन्नाभाऊ अरोरा यांनी मंडळाची बैठक आयोजीत करुण प्रेमीयुगुलाचे लग्न लावुन दिले . या सोहळ्याला मंडळाचे सचिव महेश तवले, उपाध्यक्ष गुणवंत मांढरे, कोषाध्यक्ष अभय धंदरे पेंटर, प्रविण कळंबे, प्रमोद निकुळे, मंगेश वांढरे आणि अमोल मेंढुले यांच्या सह मंडळाचे सदस्य उपस्थित होते .