रस्तावरील खड्डे देत आहे मृत्यूस आमंत्रण
तालुका प्रतिनिधी:हेमंत बोरकर मुल
मुल गोंडपिपरी मुख्य मार्गावरील जूनासुर्ला गावाजवळील रस्तावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्यामुळे वाहनाच्या वाहतुकीस अडचणी निर्माण होत आहे. हाच समस्याग्रस्त पर्यायी मार्ग वाहनचालकांची डोकेदुखी ठरत आहे. बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले असल्याने नियमित या मार्गावर छोटे मोठे अपघात होताना दिसत आहे. रस्ताच्या मधोमध ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. तर या खड्ड्यात गाडी गेल्यास जीव जाण्याचा धोका असतो त्यामुळे वाहनधारकांच्या नाकी नऊ आले आहे. मागील अनेक दिवसांपासून या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून या मार्गाने मोठ्या प्रमाणात जड वाहतूक भरधाव वेगाने होते. यातून वाट काढतांना वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. प्रवास करणे जीवघेणी कसरत केल्यासारखे आहे. ठिकठिकाणी खड्डे असल्यामुळे प्रवास करताना जीवीतास धोका निर्माण होत आहे.