ताज्या घडामोडी

राज्य सरकारने सुपर मार्केट व किराणा दुकानांमध्ये दारू विक्रीला परवानगी च्या धोरणाचा निषेध

चिमूर तालुका श्री गुरुदेव सेवा मंडळ कार्यकारिणीने केला निषेध.

उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री याना दिले निवेदन.

तालुका प्रतिनिधी:मंगेश शेंडे चिमुर

नुकतेच महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाने सुपर मार्केट व किराणा दुकानांमध्ये दारू विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला हा आक्षेपार्ह निर्णय असून राज्य सरकारच्या या धोरणाचा चिमूर तालुका श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकारिणीने निषेध करीत या निर्णयाचा पुनर्विचार करावा यासाठी दि 31 जाने ला उपविभागीय अधिकारी चिमूर मार्फत मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन
श्री गुरुदेव सेवा मंडळांचे कार्यकर्ते हे वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचे पाईक आहेत. वंदनीय श्री तुकडोजी महाराजांनी आपल्या पूर्ण आयुष्यात भजनाच्या व भाषणाच्या माध्यमातून व्यसन मुक्तीकरिता फार परिश्रम घेतलेले आहेत. युवकांना राष्ट्रभक्ती करिता तयार करीत असतांना त्यांच्या मार्गात येणारे व्यसन हे तरुणांचे आरोग्य धोक्यात आणणारे आहे असे ते म्हणत. त्यामुळे गुरुदेव भक्तांची ऐवडीच मागणी आहे की , संपूर्ण राज्यात दारुबंदी असायला पाहिजे परंतु राज्याच्या विकासाकरिता महसूल आवश्यक असल्यामुळे राज्य सरकार दारुबंदीचे पाऊल उचलत नाही हे एक कटुसत्य आहे. पण हा विषय आतापर्यंत सरकारी परवानाधारक दुकानापर्यंतच मर्यादित होता, परंतु आता मात्र शेतकऱ्यांच्या हिताकरिता व राज्यांचा महसूल वाढविण्याकरिता सुपर मार्केटमध्ये दारुविकीला परवानगी देणे म्हणजे तरुणांचा आत्मघात करण्यासारखे आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने महसूल वाढविण्याचे अन्य उपाय शोधावे. समाजाला चुकीच्या मार्गाने नेणारा व तरुण चे भविष्य धोक्यात आणणारा असा निर्णय घेऊ नये. त्यावर पुनर्विचार करावा. राज्याचा भौतिक विकास करण्याच्या नादात राज्यांचे युवक व्यसनाधिन होत असेल तर असा भौतिक विकास काय कामांचा? तो न झालेला बरा. कारण कुठल्याची राज्याची खरी शक्ती ही त्या राज्यातील निर्व्यसनी, सुदृढ, प्रामाणिक व हुशार युवकांवर असते. त्यामुळे राज्यशासनाच्या या चुकीच्या निर्णयाच्या धोरणाचा निषेध करीत सदर निर्णयाचा पुनर्विचार करावा अश्या प्रकारचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत देण्यात आला
यावेळी निवेदन देताना नत्थुजी भोयर अध्यक्ष गुरुदेव सेवा मंडळ चिमूर विठ्ठल सावरकर प्रांतसेवाधिकारी प्रा राम राऊत ग्रामगीताचार्य संघटक चंद्रपूर जिल्हा राजू देवतळे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य गजानन शिंदे अध्यक्ष वसंत कडू ग्रामसेवाधिकारी देवराव ननावरे सचिव भक्तदास जीवतोडे ग्रामगीताचार्य भास्कर वाढई दिलीप राचलवार सुखदेव ढोणे गिरीश भोपे रत्नमाला सोनुले सुधाकर निखारे भरत जांभुळे रमेश धारने अशोक चॅनफने नामदेव आळे प्रकाश बोकारे पांडुरंग अडसोडे दुर्वास तांदुळकर रवींद्र वाढई जगन्नाथ गोडे कन्हैय्या सिंग भौड आणि सर्व गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत निवेदन सादर करण्यात आले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close