रेणाखळीत शिक्षक दिन साजरा
जेष्ठ शिक्षक निलु पवार यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव.
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पिएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा रेणाखळी येथील जेष्ठ शिक्षक निलु पवार यांनी आपल्या घराजवळ हाकेच्या अंतरावरील शाळेत झालेली बदली विद्यार्थी प्रेमापोटी रद्द केली
तसेच शाळेला पीएमश्री दर्जा मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणारे तसेच एन एम एस सारख्या स्पर्धा परीक्षेत मुलांना उत्तुंग यश संपादन करून देणारे विद्यार्थी प्रिय शिक्षक नीलू पवार सर यांना शिक्षक दिनानिमित्त रेनाखळी वाशीयांकडून आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
जे धन चोरल्या जात नाही, ज्याची कुणी चोरी करु शकत नाही जे दिल्याने कमी होत नाही व उलट वाढत जातं असे अविरतपणे ज्ञान दान करणारे, सर्व सहकारी वर्गास सांभाळुन घेऊन प्रसंगी आपल्या अनुभवाचा वापर करून सर्वांना पुढे घेऊन जाण्याची प्रेरणा देणारे आमचे आदर्श मा.निलु पवार सर यांना रेणाखळी गावकऱ्यांच्या वतीने व शालेय व्यवस्थापन समितीच्या पुढाकाराने आज शिक्षक दिनाचे औचित्य साधून त्यांना * आदर्श शिक्षक *पुरस्कार देऊन सत्कार केला व त्यांच्या कार्या प्रती ऋण व्यक्त केले.मा. तंटामुक्ती अध्यक्ष तथा रेणाखळीचे जेष्ठ नागरिक श्री मुक्तारामजी हरकळ , माजी सरपंच व सोसायटी चेअरमन श्री दादाराव हरकळ शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उद्धवराव इंगळे ,प्रमोद हरकळ उपस्थित होते यावेळी मा. पवार सर यांना शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. ” कुणी कितीही दगडं मारले तरी मारणारांना गोड फळे देण्याची प्रतिक असलेले आम्र वृक्षाचे झाड देऊन गौरविण्यात आले याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे . सर्व शिक्षकांचा विद्यार्थ्यांच्या वतीने औक्षण करून सत्कार करून ऋण व्यक्त केले.