ताज्या घडामोडी

अमरपुरी भान्सुली येथे कोरोना जनजागृती कार्यक्रम

तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर

संपूर्ण जगात भयावह परिस्थिती कोरोना महामारी राक्षशी संकट पसरले आहे संपूर्ण जग सध्यास्थितीत भीतीच्या वातावरनात आहे. कुणाचे रोजगार तर विध्यार्थी यांचे शिक्षण कुणाचे पुर्णच्या पुर्ण कुटुंब उध्वस्थ झालेले आपण आपल्या डोळ्यानी पाहले आहोत भयानक परिस्थिती असताना सुद्धा लसीकरणा विषयी भीतीचे वातावरण व अफवा पसरल्या आहेत या गैरसमजुती मुळे नागरिकांची पाठ लसीकरणा कडे आपल्याला पाहायला मिळत आहे. नागरिकांच्या मनातील भीतीचे वातावरण दूर करण्यासाठी चिमुर तालुक्यातील अमरपुरी भान्सुली या गावामध्ये लोक जागृती कार्यक्रम घेण्यात आला चिमूर तालुका पंचायत समिती येथिल गटविकास अधिकारी साळवे साहेब जिल्हा परिषद यांचे कल्पकतेतुन व त्यांच्या मार्गदर्शनातुन तालुक्यातील प्रत्येक गावात पठनाट्य द्वारे जनजागृती उपक्रम हाती घेतला आहे लसीकरण जनजागृती मोहिमेचा प्रत्येक गावा गावातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. लोक स्वतःहून लसीकरनास प्रवृत्त होत आहे कोविड लसीकरण हे प्रत्येक मानवाला जगण्याचे बळ देणारे आहे त्या मुळे मनातील भिती ,अफवा व गैरसमज दूर करुन लसीकरन मोहीम यशश्वि होण्यास उत्तम प्रतिसाद द्यावा तथा स्वता परिवारास सुरक्षित ठेवावा असे आव्हान लोक जागृती कार्यक्रमातुन करण्यात येत आहे.
कोरोना लसीकरन जण जागृती कार्यक्रमामध्ये पुर्वी बहुऊद्देशीय संस्था पोभुंर्णा अध्यक्ष अनिल वाकडे कलावंत होमेश्वर मगरे , साईनाथ गुरनुले , नागेश मोहुर्ले , उमाजी वाढई व विद्या मेश्राम उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्विते करीता संजय गेजीक , समीर श्रीरामे , क्रिश धोंगडे , अतुल खोबागडे , राजु ढोक , विशाल ढोक यांनी अथक प्रयत्न केले कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला व गावातील नागरीक मोठ्या संखेने उपस्थित होते

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close