ताज्या घडामोडी

दूर्गापूरच्या दिव्यांग उज्वला निमगडे ठरल्या सन्मान पुरस्काराच्या मानकरी

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी

विदर्भाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर येथील रहिवाशी दिव्यांग उज्वला निमगडे यांना मूल मुक्कामी नुकत्याच झालेल्या एका दिमाखदार पुरस्कार सोहळ्यात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

विशेष म्हणजे प्रथमच राष्ट्रीय लोकहित सेवाने हा कर्तृत्ववान महिलांचा सन्मान पुरस्कार सोहळा आयोजित केला होता. पुरस्कार प्राप्त उज्वलाचे सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे व अधिवक्ता मेघा धोटे यांनी अभिनंदन केले आहे .या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका अधिवक्ता मेघा धोटे, मूलच्या सामाजिक महिला कार्यकर्त्या अर्चना चावरे, चंद्रपूरच्या सुपरिचित अधिवक्ता पुनम वाघमारे, उपराजधानी नागपूरातील कर्जमुक्ती अभियानाच्या गिता मेहर या शिवाय चंद्रपूर शहरातील नामवंत कवयित्री सविता कोट्टी -सातपूते, सावलीच्या शैला चिमड्यालवार, सहजच्या मुख्य संयोजिका रंज्जू मोडक, सहसंयोजिका नलिनी आडपवार, मूलच्या सामाजिक महिला कार्यकर्त्या अर्चना समर्थ, समता बन्सोड, वैजयंती गहुकर व औद्योगिक भद्रावती नगरीच्या कु. किरण साळवी प्रामुख्याने उपस्थित होत्या.निमगडे यांना हा सन्मान पुरस्कार प्राप्त झाल्या बद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close