ताज्या घडामोडी

मिलर्सकडील धान भरडाईला मिळाली ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

खासदार नेते यांच्या पत्रावर केंद्रीय मंत्री गोयल यांची मंजुरी

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी

गेल्यावर्षीच्या (वर्ष २०२२-२३) या हंगामातील राईस मिलर्सकडे असलेल्या धान भरडाईचा तांदूळ जमा करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती खासदार अशोक नेते यांच्या कार्यालयाने दिली.

धान उत्पादक पट्ट्यातील शेतकऱ्यांकडील यावर्षीच्या धान खरेदी आणि साठवणुकीची अडचण येऊ नये, राईस मिलर्सकडून योग्य ते सहकार्य मिळावे म्हणून धानाच्या मिलिंग आणि कस्टम मिल्ड राईस (CMR)च्या डिलिव्हरीसाठी मुदत वाढविण्याची मागणी खासदार अशोक नेते यांनी 27 आॅक्टोबर रोजी पत्र देऊन केंद्र सरकारकडे केली होती. त्यानुसार भारत सरकारच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत मुदत वाढवली असल्याची माहिती या विभागाचे मंत्री पियुष गोयल यांनी दिली असल्याचे खासदारांच्या कार्यालयाने कळविले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close