पाथरी लवकरच उच्च दर्जाचे भव्य क्रीडांगण उभारणार – आसिफ भैय्या खान
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
साई क्रीडा नगरी पाथरी येथे युवा नेते मा. आसिफ भैया खान यांचा सत्कार करण्यात आला,
पाथरीतील विद्यार्थ्यांनी खान यांना क्रीडांगण साठी मागणी केली, पाथरीत मागील 35 वर्षा पासुन विद्यार्थ्यासाठी कोणतेच ग्राऊन उपलब्ध नाहीं, ना ग्राउंड ना गार्डन, शासकीय वसतिगृह,मनोरंजनासाठी सभागृह नाहीत, पाथरीत नगर अध्यक्ष पद हे फक्त जागा हडप करण्यासाठी वापरण्यात आले, शहरातील गार्डनची जागा हडपण्यात आली त्या ठिकाणी प्लॉट पाडून लाखो रुपयांचा अपहार कऱण्यात आला, थोड्याच दिवसात राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केलं जाईल.आज विद्यार्थ्यासाठी कोणतेच क्रीडांगण उपलब्ध नाहीं, परंतु शहरातील जनतेने सईद भैय्या खान यांना विधानसभेत टाकत दिली, याची परतफेड म्हणून आपण युवकांसाठी उच्च दर्जाचे भव्य क्रीडांगण उभारणार असे आसिफ भैया खान यांनी सत्कार समारंभ प्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्या.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष भरत धनले सर, नगर सेवक सतीश वाकळे, माझी नगर सेवक अनिल ढवळे, मुजीब आलम, बाळासाहेब झिंजान, दिलीप हिवाळे, खालेद चाऊस, डॉ वैरांलें कलीम शेख, अतुल जत्ती सर, एजाज सिद्दीकी सर, गजु टोके, लाला राज अतिक राज सह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते सह विद्यार्थी उपस्थित होते.