ताज्या घडामोडी

खैरबंधा जलाशय पूर्ण क्षमतेने भरेपर्यंत दोन्ही पंपाद्वारे पाणी सुरु राहणार- आ.विजय रहांगडाले

शहर प्रतिनिधी: संजय नागदेवे तिरोडा

यावर्षी मान्सूनची विषम परिस्थिती असल्याने व पावसाने दडी मारल्यामुळे लावलेले खरीप धानपिक धोक्यात येवू नये v याकरिता धापेवाडा उपसा सिंचन टप्पा क्र.१ चे पाणी खळबंदा जलाशयात सोडण्याच्या कामाला आज तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आले. मागील ऑगस्ट महिन्यात काही लोकांनी श्रेय घेण्याकरिता पंपाची तांत्रिक स्थिती जाणून न घेता पाणी सोडण्याची बातमी नागरिकांना दिली होती परतुं त्या काळात १ पंप नादुरुस्त असल्यामुळे पाणी खैरबंधा जलाशयात जावू शकले नाही याची माहिती परिसरातील शेतकऱ्यांनि तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या देताच आमदार महोदयांनी उपसा सिंचन विभागाला तात्काळ सदर पंप दुरुस्त करण्याबाबत आदेशीत केले असून आजच्या घडीला दोन्ही पंप दुरुस्त झाल्याने दोन्ही पंपाद्वारे खैरबंधा जलाशयात पाणी सोडण्यात आले व जोपर्यंत खैरबंधा जलाशय पूर्ण क्षमतेने पाणी भरत नाही तेव्हापर्यंत पंप सुरु ठेवण्याचे आदेश आमदार महोदयांनी संबधीत विभागाला दिले. यावेळी धापेवाडा टप्पा क्र २ च्या पाईपलाईनकरिता पंप हाउसचे निरीक्षणसुद्धा आमदार महोदयांनी केले असून खैरबंधा जलाशयाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या २६ गावातील सुमारे १०७७१ हेक्टर जमिनीला यावर्षी खरीप धानपिकाला सिंचनाचा लाभ होणार असून शेतकऱ्यांच्यासमोर उदभवलेला सिंचनाचा प्रश्न कायम सुटणार आहे या पाणी सोडतेवेळी प्रामुख्याने कृउबास सभापती डॉ.चिंतामण रहांगडाले, माजी उपसभापती डॉ.वसंत भगत, भाजप शहरअध्यक्ष स्वानंद पारधी, शहर उपाध्यक्ष मक्रम लिल्हारे, दवनीवाडा मंडळअध्यक्ष धनेंद्र अटरे, माजी प.स.सदस्य डॉ.बी.एस.रहांगडाले, हितेंद्र (गुड्डू) लिल्हारे सेवानिवृत्त मुख्याध्यापक लक्ष्मण चौधरी, मरारटोला सरपंच गुलाब कटरे, ओबीसी आघाडी महामंत्री दिलेश पारधी, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष राजेश उरकुडे, किसान आघाडी अध्यक्ष नेहरू उपवंशी, दवणीवाडा मंडळ महामंत्री बंटी श्रीबांसरी प्रमोद गौतम, प.स.प्रमुख शिवलाल परिहार, तालुका उपाध्यक्ष,संजय पारधी,पत्रकार दीपक गीऱ्हेपंजे, राधेश्याम नागपुरे,भरत बिसेन, उपविभागीय अभियंता पी.ए.नागदेवे,शाखा अभियंता नरेश हिंगे, अभियांत्रिकी सहाय्यक प्रेमलाल गौतम व शेतकरी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close