आलापल्ली गावाचा हद्दीत नीलगाय ठार

तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी
दिनांक 25/08/2021 आलापल्ली ते भामरागड रोड वर गावचा हद्दीत, दुपारचा सुमारास वनपरीक्षेत्र खंड क्र 81 भामरागड रोड, मन्नेवार कॉलनी जवड, गावठी कुत्रांचा हल्ल्यात नीलगाय ठार मारला गेला.
निलगाय हि चरत चरत गावाचा हद्दीत आली असता गावातील कुत्र्यांनी हल्ला केला त्यात ती मरण पावली. नीलगाय चे अंदाजे वय 2 वर्ष असल्याचे बोलले जात आहे. घटनेची माहिती मिळताच वन कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी घटना स्थळी धाव घेतली. वनविभागातील एस. एस. निर्मळ वनपरिक्षेत्र अधिकारी वन्यजीव सरंक्षण पथक आलापल्ली, वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश लांडगे यांचा मार्गदर्शनात पशुवैद्यकीय अधिकारी अनिल राठोड.एन जी बावणे वनरक्षक वन्यजीव सवंरक्षण पथक, दामोधर चिव्हाने ,एस.पी. जांभुडे, पशु वैधकीय अधिकारी डॉ उत्तरेश्वर सुरवासे, सत्यपाल श्रीरामे वनरक्षक आलापल्ली वनविभाग, रामु मादेशी (वन्यजीव प्रेमी) हे उपस्थित होते.