ताज्या घडामोडी

शिवाजी महाराज जयंती सोहळ्यात रंगले कविसंमेलन

मुख्य संपादकःकु.समिधा भैसारे

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव सोहळा चिमूर तालुक्यातील गडपिपरी येथे आयोजित करण्यात आला.या सोहळ्यात कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले.कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी कवी सुरेश डांगे होते.प्रमुख अतिथी म्हणून साहित्यिक आत्माराम ढोक,कवी नामदेव मोटघरे,मनोज राऊत उपस्थित होते.तथागत भगवान बुद्ध,छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करुन कविसंमेलनाची सुरुवात करण्यात आली.

कविसंमेलनात मानवता,पर्यावरण,आईची महत्ती,विद्यमान परिस्थिती,महामानवांचे कार्य,चळवळ या विषयांवर कवींनी आपल्या कविता सादर करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कवी तलाशकुमार खोब्रागडे,रामदास राऊत,देवेंद्र निकुरे,डॉ.बाळासाहेब बन्सोड,आत्माराम ढोक,नारायण कांबळे,विलास मेश्राम,काशिनाथ रामटेके,शामराव बोरकर,सुनिल ठोंबरे,मनीषा पाटील,अमिता रामटेके,भीमराव रामटेके,पत्रूजी पाटील,नामदेव मोटघरे,गोवर्धन मंडपे यांनी आपल्या वैविध्यपूर्ण कविता कविसंमेलनात सादर केल्या.कविसंमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन मनोज सरदार यांनी केले.आभार डॉ.बाळासाहेब बन्सोड यांनी मानले.कविसंमेलनाच्या यशस्वीतेसाठी शिवजयंती महोत्सव समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close