रोटरी क्लब ऑफ कराड सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक उपक्रम राबवणार
रोटरी क्लब ऑफ कराडच्या अध्यक्षपदी रो रामचंद्र लाखोले यांची निवड…सेक्रेटरीपदी रो आनंदा थोरात.. सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक उपक्रम राबवणार
प्रतिनिधी:प्रमोद राऊत कराड
सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या रोटरी क्लब ऑफ कराडच्या अध्यक्षपदी रो रामचंद्र लाखोळे आणि सेक्रेटरी पदी रो आनंदा थोरात यांची निवड झाली आहे. रोटरी वर्ष 2024 – 25 साठी नवनिर्वाचित संचालक मंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे.
रोटरी क्लब ऑफ कराडच्या संचालक मंडळात व्हाईस प्रेसिडेंट रो रघुनाथ डुबल, जॉइंट सेक्रेटरी रो शुभांगी पाटील, ट्रेजरर रो किरण जाधव, क्लब ट्रेनर म्हणून रो गजानन माने आणि रो विनायक राऊत यांची सार्जंट आर्म म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यावर्षीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो.डॉ.सुरेश साबू , जालना यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण डिस्ट्रिक्ट मध्ये सामाजिक काम होणार आहे. या डिस्ट्रिक्ट मध्ये 11 जिल्ह्यांचा समावेश आहे यामध्ये जवळपास 91 क्लब येतात.
रोटरी क्लब ऑफ कराडचे हे 68 वे वर्ष आहे. आज अखेर रोटरी क्लब कराडने कराड आणि कराडच्या परिसरामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक कामे केली आहेत. रोटरी वर्ष सन 2024-25 या वर्षासाठी निवड झालेल्या सर्व रोटरी क्लब ऑफ कराडच्या पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र स्वागत होत आहे.
नूतन अध्यक्ष रो रामचंद्र लाखोले म्हणाले, यावर्षी ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्यावर आधारित असलेल्या ॲनिमिया फ्री इंडिया प्रोजेक्ट, कराड तालुक्यामधील विविध कॉलेजमध्ये क्वालिटी लाईफ थ्रू माईंड मॅनेजमेंट प्रोजेक्ट, अन्नछत्र प्रकल्प अंतर्गत डॉ.द.शि. एरम मूकबधिर शाळा मध्ये पोस्टीक आहार वाटप, गर्भसंस्कार शिबीर, नेत्र तपासणी शिबिर, पर्यावरण संवर्धन अंतर्गत सीडबॉल निर्मिती व वृक्षारोपण, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, स्विमिंग कॉम्पिटिशन, ॲथलेटिक्स स्पर्धा घेण्यात येतील .