ताज्या घडामोडी

देवरी येथे धान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ संपन्न

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी

आदिवासी विविध कार्यकारी सह.संस्था ता. देवरी. येथे धान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ खासदार अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते पार पडला.

या धान्य खरेदी केंद्राचा शुभारंभा प्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी व्यक्त करतांना शेतकऱ्यांनी पिकवलेल्या धान्याला आधारभूत किंमत मिळावी यासाठी सरकारने आधारभूत धान्य खरेदी केंद्रे सुरु केले आहे. या अनुषंगाने आज दिं.२० नोव्हेंबर २०२३ ला आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था ता.देवरी चा धान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ झाला. यांचा लाभ देवरी परिसरातील शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन खासदार अशोकजी नेते यांनी उदघाटन समारंभ सोहळा प्रसंगी केले.

यावेळी प्रामुख्याने माजी आमदार संजय पुराम, आदिवासी वि.महामंडळाचे संचालक भरतसिंग दुधनाग,संचालक को-ऑ. बँक गोंदियाचे महेशकुमार जैन, आदिवासी संस्था चे अध्यक्ष धुलीचंद मानकर, सभापती कृ.उ.बा. स.देवरी चे प्रमोद संगीडवार,देवरी चे नगराध्यक्ष संजय उईके, भाजपा जिल्हा महामंत्री अनिल येरणे, नगरसेविका कौशल्या कुमरे,संचालक रुपलाल पंधरे, संचालक प्रभा राऊत,संचालक ईसाराम मानकर,संचालक दिलिप राऊत, भाषकर मानकर,सुशिल शेंद्रै,सामाजिक नेते बंटी भाटीया, तसेच मोठ्या संख्येने नागरिक व शेतकरी बांधव उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close