ताज्या घडामोडी

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खडाळा स्वागत समारंभ संपन्न

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
मो.7218275486

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खडाळा ता.पुर्णा जि. परभणी येथे जिल्हा परिषदेने नुकत्याच उच्चश्रेणी मुख्याध्यापकांचा पदोन्नतीने पदस्थापना केल्या. यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडाळा येथे पदोन्नतीने श्री.नागरगोजे नागनाथ माणिकराव यांना उच्चश्रेणी मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती मिळाली आज 18 जून 2022 रोजी श्री नागरगोजे हे खडाळा या शाळेत रुजू झाले. ग्रामस्थ व शिक्षकांच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार शालेय प्रांगणात करण्यात आला. यावेळी खडाळा गावचे ह.भ.प नारायण महाराज यांच्या हस्ते मुख्याध्यापक नागरगोजे यांचा यांचे स्वागत करण्यात आला.
या प्रसंगी श्री शेख टेलर,नारायण महाराज, माजी मुख्याध्यापक व्यंकटराव जाधव यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास सुरवसे यांनी केले तर आभार ज्येष्ठ शिक्षक पांडुरंग मोरे यांनी
मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील शिक्षक ज्ञानेश्वर साखरे,प्रल्हाद राठोड राहुल काऊतकर, वर्षा पाटील आदींनी अथक परिश्रम घेतले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close