गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील विद्यापीठ परीसरात असलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या वसतीगृहासाठी स्वतंत्र व कायमस्वरुपी नियमित वार्डन ची नियुक्ती करावी

सौ. किरण संजय गजपुरे यांची कुलगुरु प्रशांत बोकारे यांना निवेदन देत मागणी
तालुका प्रतिनिधीःकल्यानी मुनघाटे नागभीड
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील विद्यापीठ परीसरात असलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या वसतीगृहासाठी स्वतंत्र व कायमस्वरुपी नियमित वार्डन ची नियुक्ती करावी यासाठी सिनेट सदस्या सौ. किरण संजय गजपुरे यांनी कुलगुरु प्रशांत बोकारे यांना निवेदन देत मागणी केली आहे. गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठ परीसरात विद्यापीठामार्फत विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह चालविल्या जात आहे. सध्या विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी वसतीगृहाची स्वतंत्र ईमारत आहे. वसतीगृहाची क्षमता १८० विद्यार्थ्यांची असली तरीही प्रशासनाने दिलेल्या सुविधांमुळे सद्यस्थितीत ३५० विद्यार्थी यात राहत आहेत . विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र ईमारत असुन जेवण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. सिनेट बैठकीत सौ. किरण गजपुरे यांनी वेळोवेळी वसतीगृहातील भौतिक सुविधा व सुरक्षा व्यवस्थांकडे लक्ष वेधल्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह ईतरही अनेक सुविधांची पुर्तता विद्यापीठ प्रशासनाने केली आहे.
या वसतीगृहाला सध्या तात्पुरत्या वार्डनची नियुक्ती विद्यापीठाने केली आहे. मात्र संबंधित वार्डन कडे अतिरिक्त भार असल्याने त्यांचे वसतीगृहाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वेळेवर उद्भवणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी वार्डन उपलब्ध होत नसल्याने संबंधित वार्डन विरोधात विद्यार्थ्यांमध्ये असंतोष आहे. मागील काही दिवसात या वार्डन विरोधात तक्रारी पण झाल्या असुन प्रशासन व सिनेट सदस्यांनी यात वेळीच हस्तक्षेप केल्याने प्रकरण तिथेच थांबविण्यात आले.
याची दखल घेत या वसतीगृहासाठी स्वतंत्र व कायमस्वरुपी नियमित दोन वार्डन ची नियुक्ती करण्याची मागणी गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्या सौ. किरण संजय गजपुरे यांनी प्रशासनाकडे केली आहे. यासाठी शासनस्तरावर मंजुरी साठी प्रस्ताव पाठविण्याची सुचना व विनंती केली आहे.
दरम्यान वसतीगृहातील विद्यार्थ्यांच्या असंतोषाच्या धनी ठरलेल्या संबंधित वार्डन चा अतिरिक्त भार काढुन तात्पुरत्या स्वरुपात विद्यापीठामार्फत स्वतंत्र वार्डनची नियुक्ती करण्याची मागणी सिनेट सदस्या सौ. किरण संजय गजपुरे यांनी कुलगुरु प्रशांत बोकारे सर यांना निवेदन देऊन केली आहे. यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन कुलगुरु महोदयांनी दिले आहे.