स्व. नितिन महाविद्यालयात हिंदी दिवस साजरा
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी येथील स्व. नितिन महाविद्यालय पाथरी येथे हिंदी विभागाच्या वतीने हिंदी भाषा प्रचार आणि प्रसार व्हावा या निमित्ताने हिंदी दिवस साजरा करण्यात आला.
या वेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राम फुन्ने हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आक्युएसीचे समन्वयक प्रा डॉ भारत निर्वळ,प्रा डॉ जगन्नाथ बोचरे,हिंदी विभाग प्रमुख प्रा डॉ मारोती खेडेकर यांची उपस्थिती होती. या वेळी बोलतांना प्रा डॉ खेडेकर म्हणाले की,देशाच्या एकता आणि अखंडतेत हिंदी भाषेचे महत्व अनन्य साधारण असून या मुळेच माणूस जोडला जातो. त्या मुळेच हिंदी भाषेला राष्ट्रीय भाषेचा दर्जा प्राप्त झाला असुन प्रत्येकाने दर दिवशी हिंदी संवाद साधला पाहिजे असे मत व्यक्त केले. या वेळी प्राचार्य डॉ राम फुन्ने यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आणि आभार प्रा संजयसिंग प्रताप सिंग ठाकूर यांनी मानले. या कार्यक्रमा साठी कोविड-१९ चे नियम पाळत महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.