ताज्या घडामोडी
मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शिक्षक भारतीचे उमेदवार सुभाष सावित्री किसन मोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
मुख्य संपादकःकु.समिधा भैसारे
मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी शिक्षक भारती संघटनेचे उमेदवार सुभाष मोरे यांनी आज कोकण भवन, बेलापूर येथे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सोबत समाजवादी गणराज्य पार्टीचे अध्यक्ष आमदार कपिल पाटील, महाविद्यालयीन कर्मचारी संघटना एमफुक्टोच्या नेत्या ताप्ती मुखोपाध्याय, शिक्षक भारतीचे अध्यक्ष गुरुवर्य अशोक बेलसरे सर, शिक्षक भारती मुंबई अध्यक्षा कल्पनाताई शेंडे उपस्थित होते.
समाजवादी गणराज्य पार्टीचे नेते, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नीरज हातेकर,समाजवादी गणराज्य पार्टीचे महासचिव अतुल देशमुख, सामाजिक कार्यकर्ते डॉल्फि डिसोझा,बुक्टूच्या मधू परांजपे यांच्यासह मुंबईभरातून संस्थाचालक, मुख्याध्यापक,शिक्षक, कर्मचारी मोठ्या संख्येने उस्फूर्तपणे सुभाष मोरे यांना पाठींबा देण्यासाठी आले होते.ही निवडणूक २६ जून रोजी होणार आहे.