ताज्या घडामोडी
महिला अभियंताने केली गळफास घेऊन आत्महत्या
मुख्य संपादक : कु. समिधा भैसारे
भद्रावती: दिनांक 19. डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता कटारिया लेआउट मध्ये एका महिला अभियंताने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे.
माहिती आधारे असे की सोनाली सुरेश उईके (वय 32) असे मृतक युवतीचे नाव आहे. ती पुणे येथे वीप्रो कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत होती. घटनेच्या दिवशी ती पुणे येथून सकाळी दहा वाजता भद्रावतीला आली होती. दुपारी चार वाजताच्या दरम्यान तिने घरीच छताच्या पंख्याला विद्युत इस्त्रीच्या केबलने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे बोलले जात आहे.
आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. सोनालीचे वडील सेवानिवृत्त वेकोली कर्मचारी आहेत.