ताज्या घडामोडी

लोक विकास केंद्रच्या वतीने महिलांना पुस्तकांचे वाण

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

लोक विकास केंद्र व कोरो इंडिया च्या वतीने, दिनांक 23 जानेवारी 2022 रोजी नितीन महाविद्यालय पाथरी येथे दुपारी दोन ते पाच या वेळेत ” संविधान जागृती समारोप, महिलांचा तीळगूळ व पुस्तके वाण वाटप कार्यक्रम ” घेण्यात आला.
लोक विकास केंद्र व कोरोइंडिया च्या वतीने दिनांक 3 जानेवारी या सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनापासून पाथरी तालुक्यातील गावांमध्ये लोक विकास केंद्र चे कार्यवाह अरविंद हमदापूरकर व महादेव पवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुनिता हिवाळे व शारदा डोईफोडे यांनी संविधान जागृती कार्यक्रम राबविला. या कार्यक्रमाचा समारोप आज संविधान विषयी माहिती देणारे पोस्टर्स प्रदर्शन भरवून करण्यात आला. या प्रदर्शनात संविधान म्हणजे काय?,नागरीकांचे हक्क व कर्तव्य, संविधानिक मुल्य इत्यादी माहिती देण्यात आली . त्यासोबतच महिलांना हळदी कुंकू लावून, तीळगूळ देऊन पुस्तकांचे वाण देण्यात आले. राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, म.ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, राजर्षि शाहू महाराज ,अण्णा भाऊ साठे या महापुरूषांची पुस्तके वाण म्हणून महिलांना भेट देण्यात आली. या कार्यक्रमात एकल व सवाष्ण महिला संयुक्तपणे सहभागी झाल्या होत्या. कोणताही भेदभाव न करता त्या एकमेकींना हळदी कुंकू लावून तीळगूळ व पुस्तकांचे वाण देत होत्या. कार्यक्रमात कोरोना काळातील सर्व प्रशासकीय नियमांचे पालन करताना एका वेळी दहा महिलांनाच हाॅल मध्ये प्रवेश देण्यात येत होता आणि चार ते पाच महिलांच्या गटाला महिला कार्यकर्त्याकडून माहिती देण्यात येत होती. यावेळी भाषण टाळून,संभाषणावर भर देण्यात आला. या कार्यक्रमासाठी मधुकर वाघमारे, नितीन कुमार वैराळ यांनी सहकार्य केले.


स्त्री कडे स्त्री म्हणून पहावे.विधवा म्हणून तिला अपमानित करू नये .तिलाही सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. तो तिला मिळाला पाहिजे. यासाठी संस्था वेगवेगळे उपक्रम राबवून समाजाचा दृष्टीकोन बदलण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यातलाच हा एक भाग होता.
संविधान हे आमच्या जगण्यातील एक अविभाज्य भाग आहे, हे जो पर्यंत प्रत्येक माणसाला समजणार नाही, तोपर्यंत त्याला संविधान आपले वाटणार नाही. त्यामुळे संविधान जागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्याची ही सुरूवात आहे.
उपस्थित महिलांना अमृता देसरडा, प्रजावती नाथभजन, आकांक्षा हमदापूरकर, जयश्री हमदापूरकर, यांनी मार्गदर्शन केले तर मंगल शिंदे, राधा कोल्हे, अनिता प्रधान, छाया पनवार, कालिंदा जोगदंड यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close