ताज्या घडामोडी

चिमूर क्रांती नाट्य रंगभूमी चिमूर / वडसा यांची तालीम सुरू

तालुका प्रतिनिधी :हेमंत बोरकर मुल

झाडीपट्टीच्या नाटकांना येत्या दिवाळीपासून परवानगी मिळणार. असे राज्य शासनाने 22 ऑक्टोंबर 2021 पासून चित्रपटगृहे व नाट्यगृहे सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे झाडीपट्टीतील सर्व नाटक कंपनीच्या तालीम सुरू झाल्या आहेत.
मागील अठरा महिन्यापासून कोरोना मूळे झाडीपट्टीचे नाटक बंद होते. परंतु, शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार नाटक चालू होणार. असे कळताच कलावंत व निर्मात्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. झाडीपट्टी रंगभूमीवर एकूण 55 ते 60 नाट्य मंडळे असून त्यामध्ये कलावंत, नेपथ्य, साऊंड सिस्टिम, पडद्यामागील कामगार यांच्या उपजीविकेचे साधन बळकट होणार आहे.
अशातच चिमूर क्रांती नाट्य रंगभूमी चिमूर/वडसा यांनी चालू वर्षी संगीत पुन्हा एकदा करा क्रांती या तीन अंकी नाटकाची रंगीत तालीम चिमूर येथील श्री. गुरुदेव सांस्कृतिक भवन येथे सुरू केली आहे. या नाट्य प्रयोगांच्या माध्यमातून नाट्य श्रोत्यांना एक दर्जेदार, सामाजिक कलाकृती पाहायला मिळणार आहे. आणि त्याचसोबत किनारा व आत्महत्या हेही नाट्यप्रयोग प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत. निर्माता-लेखक श्री. संदीप बोबडे, दिग्दर्शक श्री. गोकुल सिडाम, संकल्पना श्री.हेमचंद बोरकर, सुत्रधार अमोल मोडक यांच्या मार्गदर्शनात तालीम सुरू आहेत. कलावंत म्हणून सिने. अमोल मोडक (बोले इंडिया जय भीम,चिमूर क्रांती 1942, भारत कि खोज फेम), श्री. एच.यु. बोरकर, श्री. नितीन साखरे, श्री. उमेश ढोक, श्री. मुन्ना बोपचे, श्री. संजीव चौके, श्री. अमीर खान, श्री. उत्तम श्रीरामे, बालकलाकार साहिल रामटेके, मिस आरती व ईतर स्त्री कलावंत हे आपली कला दाखवण्यासाठी सज्ज झालेले आहेत.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close